Join us

१६ व्या वर्षी बनली स्टार, १९व्या वर्षी केलं लग्न, अंडरवर्ल्डकडून आल्या धमक्या अन् मोडला अभिनेत्रीचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 16:39 IST

1 / 10
1989 साली आलेल्या 'त्रिदेव' चित्रपटातील 'तिरची टोपी वाले, बाबू भोले भले, तू याद आने लगा है' हे गाणे तुम्हाला आठवत असेल. आता जर तुम्हाला हे गाणे आठवत असेल तर तुम्हाला या गाण्यातील अभिनेत्रीही आठवत असेल.
2 / 10
त्रिदेवचे हे लोकप्रिय गाणे नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री सोनम बख्तावर खान यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेने सोनमला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. इतकेच नाही तर आजपर्यंत ही अभिनेत्री 'ओये-ओये गर्ल' या नावाने ओळखली जाते.
3 / 10
सोनम बख्तावर खान त्यावेळी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १६-१७ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स देऊन तिने इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. सोनमने 1988 मध्ये यश चोप्रा यांच्या 'विजय' चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली.
4 / 10
काही वर्षातच सोनम बख्तावर खान बॉलिवूडच्या त्या ठिकाणी पोहोचली, जिथे पोहोचण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु फार कमी लोकांची स्वप्ने सत्यात बदलतात. 'विजय', 'त्रिदेव', 'विश्वात्मा' सारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर सोनमने इंडस्ट्रीत स्वत:ची बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली होती.
5 / 10
ज्या काळात अभिनेत्री पडद्यावर किसिंग सीन देण्यास टाळाटाळ करत असत, त्याच काळात १७ वर्षांच्या सोनमने एकापेक्षा सीन दिले.
6 / 10
सोनम बख्तावर खानला आपल्या चित्रपटात कास्ट करणे हे प्रत्येक चित्रपट निर्मात्याचे स्वप्न बनले होते. अभिनेत्रीच्या कारकिर्दीला वेग आला होता, पण त्यानंतर अचानक वयाच्या 19 व्या वर्षी तिने आपल्यापेक्षा 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शकाशी लग्न करून सर्वांनाच हैराण केले.
7 / 10
सोनम खानचे नाव डॉन अबू सालेमसोबत जोडले जाऊ लागले.अंडरवर्ल्डपासून दूर राहण्यासाठी आणि इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी अभिनेत्रीने दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम आणि राजीव 'त्रिदेव'च्या शूटिंगपासून एकमेकांना डेट करत होते.
8 / 10
सोनमसोबत लग्न केल्यानंतर राजीव यांना अंडरवर्ल्डकडून धमक्याही येऊ लागल्या. अगदी अबू सालेमनेही दिग्दर्शकावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याने राजीव आणि सोनम दोघेही खूप घाबरले आणि दोघांनीही रातोरात देश सोडण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री तिच्या कुटुंबासह वेगवेगळ्या देशांमध्ये राहिली.
9 / 10
चार देशांमध्ये राहिल्यानंतर, 2012 मध्ये, अभिनेत्रीने देशात परतण्याचा निर्णय घेतला. अंडरवर्ल्डच्या धमकीमुळे राजीव आणि सोनमचे नातेही ताणले गेले.
10 / 10
हे जोडपे आपल्या मुलासाठी वर्षानुवर्षे एकाच छताखाली राहत होते, परंतु दोन अज्ञात लोकांसारखे. शेवटी, 2016 मध्ये, मुलगा मोठा झाल्यानंतर, जोडप्याने कायदेशीररित्या त्यांचं नातं संपवलं.
टॅग्स :सेलिब्रिटी