Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंड अहुजासोबत सोनम कपूर आली पार्टीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 17:11 IST

बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच ६० वा वाढदिवस लंडन येथे सेलिब्रेट केला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक तारे-सितारे उपस्थित ...

बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच ६० वा वाढदिवस लंडन येथे सेलिब्रेट केला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक तारे-सितारे उपस्थित झाले होते. या बर्थडे पार्टीत बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर ही कुणासोबत आली होती ठाऊक आहे का? तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत ती या पार्टीत आली.  कपूर कुटुंबियांनी आनंद अहुजाला तिचा बॉयफ्रेंड म्हणून नुकतेच स्वीकारले असल्याने आनंद त्याच्या सासरेबुवांच्या पार्टीला येणं कसं काय मिस करेल? आनंद बरोबरच अर्जुन कपूर, वरूण धवन, नताशा दलाल, मोहित मारवाह, संजय कपूर, रिया कपूर यांनीही हजेरी लावली.                                                                                                     सोनम कपूर आणि आनंद अहुजा हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. त्याचप्रमाणे रिलेशनशीपमध्ये असलेलं अजून एक जोडपं म्हणजे वरूण धवन आणि नताशा दलाल. हे जोडपंही या पार्टीत सहभागी झालं होतं. सोनम कपूर-आनंद अहुजा यांचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. तसेच वरूण-नताशा यांच्याही फोटोंना अनेकांचे लाईक्स मिळाले आहेत. रिया कपूरने सोशल मीडियावर एक फॅमिली फोटो शेअर केलाय ज्यात कपूर कुटुंबियांसोबत आनंद अहुजा एकदम खुश दिसत आहे. आता सोनमच्या फॅन्सना केवळ एवढेच वाटतेय की, आता सोनम आनंद अहुजांसोबतचं नातं केव्हा अधिकृतरित्या मान्य करते.