1 / 8सोनम कपूर आणि आनंद आहुजाचा लग्नाचा वाढदिवस असून आनंदने सोनमला एक खूप छान गिफ्ट दिले आहे. सोनमने या गिफ्टचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.2 / 8सोनमने इन्स्टाग्रामवर लग्नातला एक फोटो पोस्ट केला आहे. यात सोनमचे आणि आनंदचे आईवडील दिसत आहेत. 3 / 8सोनम आणि आनंदच्या लग्नाला आज दोन वर्षं झाले आहेत.4 / 8सोनम आणि आनंदच्या लग्नाची चांगलीच चर्चा त्यावेळी मीडियात रंगली होती. लग्नात सोनम खूपच छान दिसत होती. तिचे लग्नातले अनेक फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.5 / 8२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेन्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम व आनंद पहिल्यांदा भेटले.6 / 8आश्चर्य वाटेल पण या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या गोड प्रेमकथेची सुरुवात झाली. मे २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले.7 / 8आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले,त्या दिवसापासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली होती.8 / 8सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी खूप खास होते. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.