बॉलिवूड गाजवणारी मुंबईची मुलगी! भल्याभल्या अभिनेत्रींवर पडली भारी, सौंदर्य पाहून घायाळ झालेला पाकिस्तानी क्रिकेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:21 IST
1 / 7 हिंदी चित्रपटसृष्टील ९० दशकात अनेक अभिनेत्रींनी आपला साधेपणा, सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लाखो करोडो सिनेरसिकांना वेड लावले होते. आजदेखील हे रसिक त्या अभिनेत्रींचे चित्रपट आवडीने पाहतात.2 / 7 अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. बॉलिवूडमधील साधी सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आपल्या वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक काम करत आपल्या अभिनयाने तिने सिनेप्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले होते.3 / 7 सोनालीचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी मुंबईत झाला. ९० त्या दशकातील आघाडीच्या नायिकांमध्ये तिचंही नाव आवर्जुन घेतलं जातं. आपल्या निरागसतेने आणि मोहक हास्याने तिने चाहत्यांना प्रेमात पाडलं.4 / 7 1994 च्या 'आग' चित्रपटातून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये ‘सरफरोश’, ‘जख्म’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘डुप्लीकेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.5 / 7सोनालीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तिने तेलुगू, तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. याशिवाय ती अनेक टीव्ही शोजमध्ये परीक्षकाच्या खु्र्चीत ती दिसली आहे. 'इंडियन आयडल' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' सारख्या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे.6 / 7 सोनाली तिच्या करिअरमध्ये चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकीच चर्चेत राहिली.अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. या यादीत एका क्रिकेटपटूचाही समावेश आहे. त्या काळातील सर्वोत्तम खेळाडू असलेला शोएब अख्तर सोनालीच्या प्रेमात वेडा झाला होता. 7 / 7सोनाली बेद्रेंचं गोल्डी बहल यांच्यासोबत झालं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे. सोनाली तिच्या संसारात रमली आहे.