1 / 7दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सशक्त भूमिका साकारणाऱ्या नायिका. स्मिता पाटील हयात नसल्या तरीही यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची भाची आज सिनेसृष्टीत कार्यरत आहे.2 / 7स्मिता पाटील यांची भाची बॉलिवूड आणि मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. तिचं नाव आहे विद्या माळवदे. 3 / 7विद्याने 'चक दे इंडिया' सिनेमात शाहरुख खानसोबत काम केलं होतं. भारतीय हॉकी टीमची कॅप्टन म्हणून विद्या 'चक दे इंडिया' सिनेमात झळकली होती4 / 7२००३ साली विक्रम भट दिग्दर्शित 'इंतेहा' या सिनेमातून विद्याने तिच्या करिअरला सुरुवात केली. २० हून जास्त सिनेमे केलेल्या विद्याला 'चक दे इंडिया' सिनेमातून खरी प्रसिद्धी मिळाली5 / 7१९९७ साली विद्याने वयाच्या २४ व्या वर्षी कॅप्टन अरविंद बग्गा यांच्याशी लग्न केलं. परंतु लग्नाच्या तीन वर्षातच विमान अपघातात अरविंद यांचं निधन झालं.6 / 7कमी वयात मिळालेल्या या धक्क्यातून सावरत विद्याने अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ९ वर्षांनंतर तिने दुसरं लग्न केलं. विद्याला आजही 'चक दे गर्ल' म्हणून ओळखलं जातं7 / 7विद्याला 'चक दे इंडिया'नंतर इतके चांगले सिनेमे मिळाले नाहीत. तरीही ती छोट्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला येत असते. विद्या सोशल मीडियावरही सक्रीय आहे