By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:45 IST
1 / 12बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आल्यानं इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आज सकाळी झोपेतून उठले आणि मुलगा सिद्धांत कपूर रेव्ह पार्टीत सापडल्याचं आणि त्याने ड्रग्ज सेवन केल्याची बातमी त्यांना मिळाली.2 / 12बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. यानंतर सिद्धांत कपूरला ताब्यात घेण्यात आलं. चाचणीमध्ये सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं समोर आलं आहे.3 / 12 सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. याशिवाय सिद्धांत कपूरची स्वत:ची काय ओळख आहे, ते जाणून घेऊ यात.4 / 12सिद्धांत हा डॅड शक्ती कपूर यांच्यासारखाच अभिनेता आहे. शक्ती कपूर व शिवांगी कपूर यांचा मुलगा आहे. श्रद्धा कपूर त्याची बहीण आहे. श्रद्धा व सिद्धांत या भावा-बहिणीत यांच्यात खूप प्रेम आहे. दोघांचं इन्स्टा अकाऊंट बघितल्यावर तुम्हाला याचा अंदाज येईल.5 / 12सिद्धांतने असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरूवात केली होती. भूल भुलैय्या, भागम भाग, चुप चुपके, ढोल यासारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलंय.6 / 122013 साली ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटापासून त्याने अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. अॅक्टिंग लाईनमध्ये येण्याआधी त्याने डीजे म्हणून करिअर सुरू केलं होतं.7 / 12न्यूयॉर्कच्या Lee Strasberg Theatre and Film Institute मधून त्याने फिल्म मेकिंग व अॅक्टिंगचा कोर्स केला आहे. सुमारे दोन वर्ष तो दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता.8 / 12सर्वप्रथम सिद्धांत सोहम शाह यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटातून डेब्यू करणार होता. पण हा चित्रपट बनता बनता राहिला. यानंतर त्याने ‘शूट आऊट अॅट वडाला’मधून डेब्यू केला. या चित्रपटात अनिल कपूर, जॉन अब्राहम व कंगना राणौत लीड रोलमध्ये होते.9 / 12यानंतर हसीना पारकर, जज्बा, पलटन, यारम, हॅलो चार्ली, भूत-पार्ट 1, चेहरे अशा चित्रपटात तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.10 / 12बहुतांश चित्रपटात सिद्धांत साईड रोलमध्येच दिसला. वडील शक्ती कपूरसारखं यश त्याच्या वाट्याला कधी आलंच नाही.11 / 12भौकाल या वेबसीरिजमध्येही तो दिसला. ‘हम हिंदुस्तानी’ या म्युझिक व्हिडीओमध्येही तो दिसला. सिद्धांत अद्यापही एका हिटची प्रतीक्षा करतोय.12 / 12सिद्धांत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याने 231K फॉलोअर्स आहेत. सिद्धांतचं करिअर फ्लॉप आहे. पण तो जगतो अलिशान लाईफ.