Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर मेकअपशिवायही दिसते इतकी सुंदर, त्या फोटोंवर फॅन्सकडून होतो लाईक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:53 IST
1 / 5अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर नियमितपणे तिचे फोटो शेअर करत असते. दरम्यान. श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टग्रामवर सकाळी सकाळी कॉफी पितानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फॅन्स तिचा इनोसन्स पाहून खूप कमेंट्स करत आहेत. तसेच ती मेकअपशिवायही खूप सुंदर दिसत आहे. 2 / 5श्रद्धा कपूर हिने बऱ्याच दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती हातात कॉफीचा मग घेऊन पोझ देताना दिसत आहे. तिचा चेहरा खूप सुंदर दिसत आहे. 3 / 5अभिनेत्रीला फिटनेस फ्रीक म्हणून सुद्धा ओळखले जात आहे. ती आपल्या तंदुरुस्तीची काळजी घेते. त्यासाठी ती जीममध्येसुद्धा खूप घाम गाळते. म्हणूनच कदाचित ती मेकअपशिवायही नैसर्गिकरीत्या सुंदर दिसते. 4 / 5या पोस्टवर तिचे फॅन्स खूप कमेंट्स करत आहेत. सोशल मीडियावर नेहमी श्रद्धा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 5 / 5दरम्यान, श्रद्धा कपूर गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा भुवन बामसह एक म्युझिक व्हिडीओ आला होता. तसेच ती प्रभासच्या साहो चित्रपटामध्येही दिसली होती. तसेच पुढच्या काळामध्येही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.