1 / 6कधीकधी काही चुकीच्या बातम्यांचा आणि अफवांचा कलाकारांच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याचा विचारच करु शकत नाही. हा किस्साही असाच. जेव्हा अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या मृत्यूची अफवा बाहेर आली2 / 6हा किस्सा आहे १९९५ साली घडलेला. शिल्पा शिरोडकर ही रघुवीर सिनेमात सुनील शेट्टीसोबत काम करत होती. त्याचवेळी अचानक शिल्पा शिरोडकरची गोळ्या घालून हत्या, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली3 / 6शिल्पा त्यावेळी मनाली येथे शूटिंग करत होती. लेकीच्या मृत्यूची ही बातमी शिल्पाच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली. त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी शिल्पाला फोनवर फोन केले. परंतु शिल्पा शूटिंग करत असल्याने ती फोन घेऊ शकली नाही4 / 6जेव्हा शिल्पा पुन्हा रुममध्ये आली तेव्हा तिच्या आई-बाबांचे २०-२५ मिस कॉल आले होते. वर्तमानपत्रात छापून आल्याने शिल्पाच्या आई-बाबांना प्रचंड धक्का बसला. 5 / 6शिल्पा शिरोडकला नंतर कळालं की सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी निर्मात्यांनी ही बातमी मुद्दाम छापून आणली होती. परंतु यामुळे लेकीच्या काळजीपोटी शिल्पाच्या आई-बाबांचा जीव घाबरा झाला होता.6 / 6शिल्पा शिरोडकरने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. आजही हा किस्सा सांगताना आई-बाबांची अवस्था आठवून शिल्पाच्या अंगावर शहारे उठतात