"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:46 IST
1 / 9'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलला 'बिग बॉस १३' मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. शोमधील तिच्या निरागसतेने चाहत्यांची मनं जिंकली आणि ती संपूर्ण भारताची फेव्हरेट बनली.2 / 9शहनाजने स्वतःमध्ये खूप बदल केले, मेहनत केली. म्युझिक व्हिडिओनंतर तिने हिंदी चित्रपट आणि त्यानंतर पंजाबी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज ती केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर एक निर्माती देखील आहे.3 / 9शहनाजसाठी या शिखरापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. तिला अनेकदा फसवणुकीचा सामना करावा लागला. आज ती स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक खंबीर मानते. या संघर्षांमुळेच आपण आज या खास पदापर्यंत पोहोचू शकलो, असं तिचं म्हणणं आहे. 4 / 9'झूम फॅनक्लब'शी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'तुम्ही लोकांसमोर आपल्या भावना व्यक्त करू नका. तुम्हाला खंबीर राहावं लागेल. तुमचे अश्रू तुमच्या कामात गुंतवा. अनेक लोकांकडून फसवणूक झाल्यानंतरच आज मी परिपक्व झाले आहे.' 5 / 9'मी खूप स्ट्रगल केला आहे. जर मी त्याबद्दल सांगायला लागले, तर माझी बायोपिकही बनू शकणार नाही. तुम्हाला खंबीर बनावंच लागेल. आयुष्यात स्ट्रगल करणं गरजेच आहे. जर तुम्ही स्ट्रगल करून पुढे गेलात, तर चांगल्या गोष्टी घडतात.'6 / 9शहनाज तिच्या 'बिग बॉस'मधील 'बबली' इमेजसाठी ओळखली जाते. आपल्या मेकओव्हरबद्दल ती म्हणते, 'पूर्वी लोक मला मूर्ख समजायचे. तेव्हा मी फनी आणि बबली होते. पण जेव्हा तुमची फसवणूक होते, तेव्हा तुमची आयुष्याबद्दलची समज वाढते.'7 / 9'तुम्ही परिपक्व आणि स्वतंत्र होता. एका काळानंतर तुम्हाला अक्कल येतेच.' शहनाजने चाहत्यांना सल्ला देताना सांगितलं की, 'संघर्षाच्या काळात कठोर परिश्रम करा. कर्मावर विश्वास ठेवा आणि योग्य रस्ता निवडा.'8 / 9'तुम्हाला सकारात्मक राहावं लागेल. आपली कमकुवत बाजू आणि अश्रू कोणालाही दाखवू नका, लोक त्याचा फायदा घेतात. इथे सगळे राक्षस आहेत. तुमच्या खऱ्या भावना फक्त जवळच्या व्यक्तींसमोरच व्यक्त करा.'9 / 9शहनाजने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'थँक्यू फॉर कमिंग'मध्ये दिसली. चाहते आता तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.