Join us

'मन्नत'ची एक वीट बदलण्यासाठी सुद्धा शाहरुखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:06 IST

1 / 11
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ( Shahrukh Khan) 'मन्नत' बंगला हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रसिद्ध बंगल्यापैकी हा एक आहे. तब्बल २७ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या बंगल्याचं आपलं वेगळं स्टारडम आहे.
2 / 11
मुंबईतील बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी समोरच हा बंगला आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंगल्याचं लवकरच नूतनीकरण केलं जाणार आहे. यासाठी शाहरुख काही महिन्यांसाठी मन्नत (Mannat ) सोडणार असून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणार आहे.
3 / 11
या आलिशान बंगल्याचं नूतनीकरण सहज होत नाही. यासाठी शाहरुखला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागली आहे.
4 / 11
कारण, किंग खानचा 'मन्नत' बंगला (Grade 2-B Heritage) हा ऐतिहासिक महत्त्व असल्यानं प्रत्यक्षात 'वारसा दर्जा' श्रेणीत येतो. एखादी मालमत्ता, आस्थापना, स्थळ किंवा जागा यांना सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असल्यास त्यांना वारसा दर्जा प्राप्त होत असतो.
5 / 11
१९९५ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रेटर मुंबईच्या वारसा स्थळांच्या पहिल्या यादीत शाहरुख खानच्या 'मन्नत'चं नाव होतं. या बंगल्याला ग्रेड-३ मालमत्तेचा दर्जा देण्यात आला होता. त्याचे मूळ नाव 'व्हिला वियना' होतं.
6 / 11
यानंतर २००६ मध्ये नवीन यादीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई वारसा संवर्धन समितीने (एमएचसीइज) या मालमत्तेला 'ग्रेड २-ब' चा (Grade 2-B Heritage) दर्जा दिला. 'मन्नत' बंगला हा समुद्रकिनारी असल्यामुळे याला वास्तुशास्त्रीय महत्त्व असल्याचं मुंबई वारसा संवर्धन समितीकडून नमूद करण्यात आलं होतं.
7 / 11
मुंबईतील वारसा मालमत्तांचे वर्गीकरण हे ३ मुख्य श्रेणींमध्ये केलं जातं. त्या म्हणजे श्रेणी १, श्रेणी २ व श्रेणी ३. तर श्रेणी २ मध्ये श्रेणी २-अ व श्रेणी २-ब अशा दोन उपश्रेणी आहेत.
8 / 11
यात श्रेणी १ मालमत्ता म्हणजे राष्ट्रीय किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारती किंवा स्थळे, ज्यात उत्कृष्ट वास्तुशिल्प रचनांचादेखील समावेश होतो. तर श्रेणी २ म्हणजे श्रेणी २ मालमत्तेमध्ये विशेष वास्तुशिल्प आणि सांस्कृतिक गुणवत्ता असलेल्या स्थानिक आणि प्रादेशिक इमारती व परिसर समाविष्ट होतो. तर श्रेणी ३ मध्ये शहराच्या लँडस्केपसाठी महत्त्वाच्या असलेल्या इमारती आणि स्थळे.
9 / 11
शाहरुख खानने २००१ मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. त्यात कोणतेही संरचनात्मक बदल करण्याची परवानगी नाही. म्हणून त्याने मूळ व्हिला (व्हिएन्ना) मागे ६ मजली इमारत बांधली आणि त्याचं नाव मन्नत ठेवलं.
10 / 11
ही मालमत्ता वांद्र्याच्या दक्षिणेकडील टोकावर, लँड्स एंड नावाच्या द्वीपकल्पीय जमिनीच्या पट्ट्यावर आहे, जी अरबी समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या पट्ट्याच्या अगदी शेवटी त्याच्या दक्षिणेकडील टोकावर, वांद्रे किल्ल्याचे अवशेष आहेत. हा परिसर समुद्राच्या जवळ असल्याने, मालमत्ता मालकांना किनारी क्षेत्रांमध्ये विकास मंजुरीचे नियमन करण्यासाठी राज्याची नोडल एजन्सी असलेल्या MCZMA कडून मंजुरी घ्यावी लागेल. याशिवाय, महानगरपालिका आणि न्यायालयाकडून आवश्यक मान्यता घ्यावी लागेल.
11 / 11
शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये नूतनीकरणात दोन अतिरिक्त मजले जोडले जाणार आहेत. ज्यामुळे बिल्ट-अप क्षेत्रफळ६१६.०२ चौरस मीटर होईल. मालमत्तेची उंची वाढणार असल्यान, MCZMA कडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल, कारण मालमत्तेची उंची तसेच विस्तार काही स्वीकार्य मर्यादेतच ठेवावा लागेल' याशिवाय, नूतनीकरणाचे काम 'शाश्वत' पद्धतीने केले पाहिजे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
टॅग्स :शाहरुख खानमुंबई