‘संजू’च्या कलाकारांनी घेतली इतकी फी, रणबीर कपूरने घेतले सर्वाधिक मानधन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 20:59 IST
सध्या बॉलिवूडप्रेमींमध्ये ‘संजू’ हा चित्रपट आणि यातील रणबीर कपूरची भूमिका याचीच चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तर चाहत्यांची उत्कंठा ...
‘संजू’च्या कलाकारांनी घेतली इतकी फी, रणबीर कपूरने घेतले सर्वाधिक मानधन!!
सध्या बॉलिवूडप्रेमींमध्ये ‘संजू’ हा चित्रपट आणि यातील रणबीर कपूरची भूमिका याचीच चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तर चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने प्रचंड मेहनत घेतलीय. रणबीरशिवाय अन्य कलाकारांनाही रिअल दाखवण्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी कुठलीही कसर सोडलेली नाही. आता जाणून घेऊ यात, या कलाकारांनी आपआपल्या भूमिकांसाठी किती मानधन घेतले ते.तब्बू चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. यात ती स्वत:चीच भूमिका करताना दिसणार आहे. या छोट्याशा भूमिकेसाठी तिने ६० लाख रूपये मानधन घेतले. करिश्मा तन्ना करिश्माने चित्रपटात माधुरी दीक्षितची भूमिका साकारली आहे. सूत्रांचे मानाल तर माधुरीने या चित्रपटात तिचे जास्त सीन्स दाखवण्यास मनाई केली होती. त्यामुळे यात करिश्माच्या वाट्याला केवळ १० ते १५ मिनिटांची भूमिका आली आहे. पण या १० ते १५ मिनिटांसाठी तिने १ कोटी रूपये घेतलेपरेश रावल परेश रावल यांनी चित्रपटात संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये परेश रावल यांचा दमदार अंदाज दिसला आहे. या भूमिकेसाठी परेश यांनी २ ते ३ कोटी रूपये घेतल्याचे कळते.मनीषा कोईराला मनीषा कोईरालाने या चित्रपटात संजय दत्तची आई नरगिस दत्तची भूमिका साकारली आहे. या भूमिकेद्वारे मनीषा दीर्घ काळानंतर बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. यासाठी तिने ३ कोटी रूपये मानधन घेतल्याचे कळते.दीया मिर्झा दीया सुद्धा दीर्घकाळानंतर या चित्रपटात दिसणार आहे. तिने या चित्रपटात संजयची विद्यमान पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारली आहे. मान्यतासारखी दिसण्यासाठी दीयाने आपल्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली. यासाठी तिने ३ कोटी रूपये मानधन घेतल्याचे समजते.सोनम कपूर सोनम कपूरने चित्रपटात संजयची पहिली गर्लफ्रेन्ड टीना मुनीम हिची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी सोनमने ६ कोटी रूपये घेतल्याचे बोलले जाते.रणबीर कपूर रणबीर कपूरने या चित्रपटासाठी कधी नव्हे इतकी मेहनत घेतली आहे. संजयच्या भूमिकेत शिरण्यासाठी रणबीरने स्वत:च्या फिजीकवर प्रचंड लक्ष दिले. संजय दत्त बनण्यासाठी त्याने सर्वाधिक २५ कोटी रूपये मानधन घेतल्याचे कळते.