Join us

Photos: स्मित हास्य, डोळ्यावर गॉगल... डिस्चार्जनंतर नवाबी थाटात दिसला सैफ अली खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:15 IST

1 / 10
अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan Discharged From Hospital) आज डिस्चार्ज मिळाला आहे.
2 / 10
१६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज २१ जानेवारीच्या दुपारी अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
3 / 10
डिस्चार्जनंतर सैफची पहिली झलक समोर आली आहे. अगदी नवाबी थाटात सैफ त्याच्या घरी पोहोचला आहे.
4 / 10
सैफ अली खान घरी पोहोचल्यावर इमारतीच्या परिसरात पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
5 / 10
जिवघेणा हल्ला, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया आणि आज पाच दिवसानंतर सैफ पाहायला मिळाला आहे. सैफ अली खानचे अनेक चाहते आहेत. त्याच्या प्रकृतीसाठी सगळेच प्रार्थना करत होते.
6 / 10
डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये आला. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि डोळ्यावर गॉगल अशा स्वॅगमध्ये तो दिसला.
7 / 10
डॉक्टरांनी सैफला डिस्चार्ज दिला असला तरी त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्याच्या जखमा अद्याप ताज्याच आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस सैफला काळजी घ्यावी लागणार आहे.
8 / 10
सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पहाटे २-२.३० च्या सुमारास हल्ला झाला होता. आरोपीने त्याच्यावर चाकून ६ वार केले. यानंतर सैफला रक्तबंबाळ अवस्थेत लीलावती रुग्णालयात नेण्यात आले.
9 / 10
लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी सैफवर सर्जरी केली. त्याच्या पाठीतून २ इंचाचा चाकूचा तुकडा काढला. पाच दिवसांनी आज सहाव्यादिवशी त्याला घरी सोडण्यात आलं.
10 / 10
सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. कालच त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
टॅग्स :सैफ अली खान हॉस्पिटलमुंबईसेलिब्रिटीबॉलिवूड