Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटूशी जोडलं गेलं नाव, नंतर केलं अनफॉलो; मालदीवच्या बीचवर 'तिचा' हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:31 IST

1 / 8
क्रिकेट आणि मनोरंजनविश्वाचं नातं जवळचं आहे. विराट कोहली, युवराज सिंग ते हरभजन सिंह अशा अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं.
2 / 8
दरम्यान मधल्या काळात एका जोडीची खूप चर्चा झाली. ती म्हणजे युझवेंद्र चहल आणि आरजे महावश. चहलच्या घटस्फोटानंतर महावशसोबत त्याचं अफेअर असल्याची चर्चा झाली.
3 / 8
यावर महावशने तिच्या मजेशीर अंदाजात स्पष्टीकरण देत सर्व ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. दरम्यान काही महिन्यांपूर्वी महावश आणि चहलने एकमेकांना अनफॉलो केलं. याचीही खूप चर्चा झाली.
4 / 8
सोशल मीडिया इंफ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आरजे महवश सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता महावश समुद्रकिनारी ऑरेंज लूकमध्ये दिसली.
5 / 8
ती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या फोटोंमध्ये महावशने नारंगी रंगाचा हॉल्टर नेक सीक्विन बीच ड्रेस घातला आहे. समुद्राच्या निळ्याशार पाठीमागे तिचा हा लूक अत्यंत लक्षवेधी आणि ट्रेंडी दिसत आहे.
6 / 8
हे फोटो शेअर करताना तिने एक खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, 'मी कोणत्याही माफीशिवाय फक्त माझं आयुष्य जगतेय.' तिच्या या विधानाने आणि फोटोंमधील आत्मविश्वासाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
7 / 8
आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने सॉफ्ट ग्लॅम मेकअप आणि न्यूड टोन शेड्सचा वापर केला आहे. सोबतच तिने घातलेली 'बीच ज्वेलरी' तिच्या संपूर्ण सौंदर्याला अधिकच चकाकी देत आहे.
8 / 8
चहलसोबत तिचे ब्रेकअप झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. अशातच तिचे हे फोटो समोर आल्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत आहेत. तिच्या प्रत्येक पोजमधील 'कातिलाना' अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीयुजवेंद्र चहलव्हायरल फोटोज्