Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेरे नाम' मधील 'निर्जरा' आठवतेय? ४७ व्या वर्षीही तिचं सौंदर्य पाहून चाहते झाले थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:51 IST

1 / 12
'तेरे नाम' चित्रपटात सलमान खानची नायिका 'निर्जरा' हिची भूमिका साकारणाऱ्या भूमिका चावलाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही तिचे फोटो पाहून चाहते तिच्या सोज्वळपणावर फिदा होतात.
2 / 12
२००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'तेरे नाम' हा सलमान खानच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील भाईजानच्या हेअरस्टाईलपासून त्याच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींनी चाहत्यांची मने जिंकली. पण एका खास गोष्टीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती, ती म्हणजे 'राधे'च्या 'निर्जरा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका चावलाने.
3 / 12
भूमिका चावलाने आपल्या निरागस साधेपणाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. २२ वर्षांनंतरही चाहते तिला 'निर्जरा' याच नावाने ओळखतात.
4 / 12
आज भूमिका चावला ४७ वर्षांची झाली आहे, तरीही तिचे सौंदर्य पूर्वीसारखेच टिकून आहे. आम्ही असे म्हणत नाही, तर तिची लेटेस्ट सोशल मीडिया पोस्ट हेच सांगत आहे, ज्यावर चाहते सध्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
5 / 12
भूमिका चावलाने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या प्रिंटेड स्कर्ट आणि फ्लोरल ब्लॅक टॉपमध्ये दिसत आहे. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये 'रिलोड रिप्ले' असे लिहिले आहे.
6 / 12
या पोस्टवर चाहत्यांनी 'हार्ट' इमोजींचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले, 'तेरे नामची आठवण आली', तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'तेरे नाम से शुरू, तेरे नाम पर खत्म.'
7 / 12
भूमिका चावलाचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ रोजी नवी दिल्ली येथे झाला. ती एका पंजाबी कुटुंबातील असून तिचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. लष्करात वडिलांची बदली होत असल्यामुळे तिचे कुटुंब वेगवेगळ्या शहरांत स्थलांतरित होत असे.
8 / 12
ती तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती. लहानपणापासूनच तिला अभ्यासासोबतच अभिनय आणि ग्लॅमरच्या जगाची आवड होती. १९९७ मध्ये तिने मुंबईची वाट धरली. येथे तिने सुरुवातीला टीव्ही जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम करायला सुरुवात केली. हळूहळू तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आणि आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
9 / 12
भूमिकाने २००० मध्ये 'युवाकुडू' या तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. हा तिचा पहिलाच चित्रपट होता, पण तिला इतके मोठे यश मिळाले की तिला तेलगू फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.
10 / 12
यानंतर तिने तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये सातत्याने काम केले आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. तिचे 'कुशी', 'ओक्काडू' आणि 'सिम्हाद्री' हे तेलगू चित्रपट सुपरहिट ठरले, तर 'बद्री' आणि 'सिल्लुनु ओरु काधल' या तमिळ चित्रपटांनीही खूप प्रशंसा मिळवली.
11 / 12
२००३ मध्ये तिने सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धमाका केला नाही, तर भूमिकाच्या लोकप्रियतेतही भर घातली.
12 / 12
या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये भूमिकाची चर्चा सुरू झाली आणि तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. मात्र, 'तेरे नाम' सारखी लोकप्रियता तिला इतर कोणत्याही हिंदी चित्रपटातून पुन्हा मिळाली नाही.
टॅग्स :भूमिका चावलासलमान खान