1 / 7२००३ साली प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा 'कोई मिल गया' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. या चित्रपटातील 'जादू'सोबतच रोहितच्या मित्रांच्या टोळीनेही सर्वांची मने जिंकली होती. या टोळीतील सर्वात खोडकर म्हणजे 'बिट्टू सरदार'.2 / 7आज ३४ वर्षांनंतर या बिट्टू सरदारचा म्हणजेच अभिनेता अनुज पंडितचा लूक इतका बदलला आहे की, त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. सिनेमातील निरागस बिट्टू आता एकदम हँडसम दिसतो.3 / 7बालकलाकार म्हणून लोकप्रिय झालेल्या अनुज पंडित शर्माने पुढे मोठं झाल्यावर आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली असून त्याचे 'ट्रान्सफॉर्मेशन' पाहून चाहते थक्क झाले आहेत.4 / 7अभिनेते सतीश शाह यांच्या 'अपुन तो बस वैसे ही' या टीव्ही शोमध्ये अनुजने 'बिट्टू शर्मा'ची भूमिका साकारली होती. हा शो पाहून दिग्दर्शक राकेश रोशन इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेच अनुजला चित्रपटासाठी विचारणा केली. त्यावेळी अनुज केवळ ११ वर्षांचा होता.5 / 7अनुज पंडित शर्मा केवळ बालकलाकार म्हणून थांबला नाही, तर त्याने अभिनयाचा प्रवास सुरूच ठेवला आहे. त्याने 'टोटल सियाप्पा', 'डरना मना आहे' यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे.6 / 7याशिवाय 'परवरिश - सीझन २' सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय अनुजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'बामिनी अँड बॉईज' या वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.7 / 7अनुज सोशल मीडियावर खूप सक्रिय असून इन्स्टाग्रामवर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. तो वारंवार आपले वर्कआउट व्हिडिओ आणि स्टायलिश फोटो शेअर करत असतो