Join us
Daily Top 2Weekly Top 5

​वाचा, सनी देओल अन् डिम्पल कपाडियाची प्रेमकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:21 IST

अक्षय कुमारची सासूबाई डिम्पल कपाडिया आणि अभिनेता सनी देओल या दोघांच्या एका ताज्या फोटोने सध्या इंटरनेटवर आग लावली आहे. ...

अक्षय कुमारची सासूबाई डिम्पल कपाडिया आणि अभिनेता सनी देओल या दोघांच्या एका ताज्या फोटोने सध्या इंटरनेटवर आग लावली आहे. लंडनच्या रस्त्यावर टीपलेल्या या फोटोत डिम्पल आणि सनी दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बसले आहेत. जगाची पर्वा न करता अगदी बेफिकीरपणे दोघांच्याही गप्पा सुरु आहेत. हा फोटो व्हायरल झाला अन् डिम्पल व सनीच्या अनेक वर्षांआधी रंगलेली प्रेमकथा पुन्हा एकदा जिवंत झााली.९०च्या दशकात डिम्पल व सनीची लव्हस्टोरी कधी नव्हे इतकी चर्चेत होती. लोकांनी यांना पती-पत्नी म्हणून बोलवणेही सुरु केले होते. केवळ इतकेच नाही तर डिम्पलच्या दोन्ही मुली टिष्ट्वंकल व रिंकी या दोघींनीही सनीला पापा म्हणून बोलवणे सुरु केले होते.सनीच्या आयुष्यात आधी अमृता सिंह आली. पण अमृतासोबत प्रेम बहरत असताना सनीने तो विवाहित आहे, हे तिच्यापासून लपवून ठेवले. एका मुलाखतीत अमृताने सनीबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. माझ्या आयुष्या खरा पुरूष कुणी होता तर तो सनी देओलच होता. पण तोही धोकेबाज निघाला. तो विवाहित आहे, हेच मला ठाऊक नव्हते.अमृतासोबत बिनसल्यानंतर सनीच्या आयुष्यात डिम्पल आली. त्याही वेळी निश्चितपणे सनी विवाहित होता. पण पत्नी पूूजा देओल सोबत असतानादेखील सनी डिम्पलमध्ये गुंतला.   डिम्पल राजेश खन्नापासून विभक्त झाली आणि नेमक्या याच काळात सनी व डिम्पल यांच्यातील जवळीक प्रचंड वाढली. १९८२ मध्ये राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यावर डिम्पल व सनी दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागला होता. सनीची पत्नी पूजा ही सुद्धा मुंबईत होती. पण तरिही तो डिम्पलसोबत राहत होता. यादरम्यान सनी व डिम्पल या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती.सनी व डिम्पल या दोघांनी आपले लव्ह लाईफ बरीच वर्षे लपवून ठेवले. डिम्पल व सनी दोघांपैकी कुणीही त्यांचे नाते जगजाहिर करायला तयार नव्हते. खरे तर सनीची एक्स गर्लफ्रेन्ड अमृता सिंह हिनेच या नात्याला तोंड फोडले. सनी व डिम्पल यांच्या रिलेशनबद्दल विचारले गेल्यावर अमृता तिच्या मनातील कटुता लपवू शकली नव्हती. डिम्पलजवळ केक आहे आणि ती तो खात आहे. तिच्याकडे गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही, तिला जे हवे होते, ते तिला मिळालेय, असे अमृता एका मुलाखतीत म्हणाली होती.ALSO READ : Viral Pic :लंडनमध्ये हातात हात घालून फिरताना दिसले सनी देओल अन् डिम्पल कपाडिया !सनी व डिम्पल यांचे प्रेम ११ वर्षे चालले. या काळात दोघेही अतिशय जवळ आले होते. पण रवीना टंडनची एन्ट्री झाली आणि या प्रेमकथेला ब्रेक लागला. अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपमुळे रवीना निराश होता. या काळात तिला सनीचा आधार मिळाला आणि यानंतर सनी व डिम्पल हळूहळू दूर होत गेले. काहींच्या मते, कौटुंबिक दबावामुळे सनीला डिम्पलसोबतचे नाते तोडावे लागले. पण कदाचित सनीच्या हृदय कायम डिम्पल होती. समाजासाठी त्यांनी प्रेमाचा त्याग केला. अर्थात खरे काय झाले हे डिम्पल व सनीशिवाय कुणीचजाणत नाही.सनीचे पूजासोबतचे लग्न अनेकांच्या मते, एका बिझनेस अ‍ॅग्रीमेंटअंतर्गत झाले होते. ‘बेताब’ रिलीज होण्यापूर्वीच सनीचे पूजासोबत लग्न झाले होते. पण ‘बेताब’ रिलीज झाल्यावर सनीच्या रोमॅन्टिक इमेजवर परिणाम होऊ नये, असे धर्मेन्द्रला वाटत होते. रिलीजपर्यंत पूजा लंडनमध्ये होती. त्यावेळी सनी तिला भेटण्यासाठी चोरून लपून लंडनला जायचा. सनीच्या लग्नाची बातमी फुटली तेव्हा आधी सनीने इन्कार केला होता. पण सनीच्या वाढत्या अफेअर्सची चर्चा व्हायला लागल्यावर मात्र पूजाने मोर्चा सांभाळला.