रंग बरसे...भीगे चुनरवाली..रंग बरसे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
विविध रंगांत आपलं अख्खं आयुष्य रंगवणारा सण म्हणजे होळी, धुलीवंदन. सर्वसामान्यांप्रमाणेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही होळीचे रंग उधळले. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदा याने कुटुंबियांसमवेत होळीच्या विविध रंगांचा आनंद लुटला.
रंग बरसे...भीगे चुनरवाली..रंग बरसे....
विविध रंगांत आपलं अख्खं आयुष्य रंगवणारा सण म्हणजे होळी, धुलीवंदन. सर्वसामान्यांप्रमाणेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही होळीचे रंग उधळले. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदा याने कुटुंबियांसमवेत होळीच्या विविध रंगांचा आनंद लुटला.गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजा, मुलगी टीना अहुजा आणि मुलगा यशवर्धन यांच्यासह होळीचे रंग खेळले. विविध रंगांच्या होळीचा आनंद त्याने लुटला. पत्नी सुनीता अहुजासोबत होळी खेळण्यासाठी असा सज्ज झाला होता आपला लाडका गोविंदा. ‘आ गया हिरो’ या आगामी चित्रपटामुळे गोविंदा चर्चेत आहे. त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून त्याने फॅमिलीसोबत होळी खेळणे पसंत केले. पत्नी सुनीता गोविंदाला रंग लावत असताना... मुलगी टीना तिचा भाऊ यशवर्धनला यावेळी रंग लावताना दिसतेय. सोबतच गोविंदा आणि सुनीता हे एकमेकांसोबत होळीचा आनंद लुटत आहेत.