Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणदीप हुड्डा झाला बाबा, वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म झाल्याने अभिनेत्याची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:34 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि त्याची पत्नी लिन लैशराम (Lin Laishram) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जोडप्यानं आपल्या बाळाचं स्वागत केलंय.
2 / 10
लिन लैशराम आई झाली आहे. वयाच्या ४०व्या वर्षी लिन लैशरामनं मुलीला (Randeep Hooda Lin Laishram Blessed With Baby Girl) जन्म दिला आहे.
3 / 10
रणदीप हुड्डानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गूड न्यूज दिली आहे. रणदीपने चाहत्यांना आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे.
4 / 10
विशेष म्हणजे रणदीपसाठी हा आनंद दुहेरी ठरला आहे, कारण आज १० मार्च २०२६ त्याच्या मुलीचा जन्म झाला आणि आजच त्याच्या वडिलांचा वाढदिवस असतो.
5 / 10
रणदीपने पोस्टमध्ये आनंदाने लिहिले की, 'आजोबा आणि नातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!'
6 / 10
बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करताना रणदीप कमालीचा भावुक झाला. त्याने आपल्या पोस्टमध्ये वडिलांप्रती आदर व्यक्त करताना पत्नीचेही आभार मानले.
7 / 10
रणदीप म्हणाला, 'आज मी बाबा झालो आहे आणि त्यामुळे बाबांबद्दलचा माझा आदर आणखी वाढला आहे. लिन, मला बाबा बनवल्याबद्दल आणि आपल्या छोट्या मुलीला या जगात आणल्याबद्दल तुझे मनापासून आभार'.
8 / 10
रणदीपने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
9 / 10
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लिन हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपरिक थाटात पार पडला. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
10 / 10
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न केलं होतं. आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या आनंदामुळे दोघेही प्रचंड आनंदी झाले आहेत.
टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूड