Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरी कोणी नसताना चोरट्यांनी डाव साधला! प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या झालेली निर्घृण हत्या, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:41 IST

1 / 8
'अखियों के झरोको से','दिल अपना प्रीत परायी' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या प्रख्यात अभिनेत्री तथा हिंदी चित्रपटसृष्टीच्या लाडकी आई असलेल्या उर्मिला भट्ट.
2 / 8
उर्मिला भट्ट जन्म १ नोव्हेंबर १९३३ रोजी डेहराडून येथे झाला. त्यांनी प्रसिद्ध गुरू श्री कुबेरनाथ तंजोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम शिकले. नृत्यांगना आणि गायिका म्हणून राजकोटमधील संगीत कला अकादमीमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी नाटकातून करिअरला सुरुवात केली.जवळपास ७५ गुजराती चित्रपट आणि १५ ते २० राजस्थानी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मात्र,या अभिनेत्रीचं जाणं मनाला चटका लावणारं होतं.
3 / 8
दरम्यान, अभिनेत्री उर्मिला भट्ट यांनी रंगभूमीवरील यशस्वी कारकिर्दीनंतर १९६० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
4 / 8
आपल्या अभिनय कारकीर्दीत उर्मिला भट्ट यांनी 'गौरी', 'संघर्ष आणि हमराज' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय चित्रपटांमध्ये 'अखियों के झरोखों से' ,'गीत गाता चल' , 'बेशरम','राम तेरी गंगा मैली','बालिका वधू' आणि अलीबाबा मरजिना या चित्रपटांचा समावेश आहे.
5 / 8
उर्मिला भट्ट आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा, रणजीत, डॅनी डेंगझोप्पा आणि हेमा मालिनी यासारख्या बड्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली होती.
6 / 8
रामायणमध्ये सीतेच्या आईची भूमिकेमुळे आजही उर्मिला भट्ट प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. उर्मिला भट्ट त्यांच्या कुटुंबासह जुहू येथील बंगल्यात आनंदी जीवन जगत होत्या.मात्र, चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी अभिनेत्रीची हत्या करण्यात आली. अजूनही उर्मिला भट्ट यांच्या मुत्युचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.
7 / 8
२२ फेब्रुवारी १९९७ ला मुंबईतील जुहू परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. चोरीच्या उद्देशाने उर्मिला यांची हत्या झाल्याचं पोलिस तपासात उघड झालं. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेला आढळला होता. उर्मिला भट्ट यांचा जावई विक्रम पारिख घरी आले असता, कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे विक्रम यांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा बेल वाजवून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने भट्ट यांची मोलकरीणही निघून गेल्याचं त्यांना समजलं. तेव्हा, विक्रम यांनी पत्नी रचनाला बोलावून घेतलं.
8 / 8
लेक रचना आणि जावई विक्रम यांनी घराचा दरवाजा तोडला आणि त्यांना जबर धक्का बसला. अभिनेत्री उर्मिला भट्ट गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घरातील सामानही चोरीला गेलं होतं. त्यांचे पती गुजराती नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक मार्कंडेय भट्ट बडोद्याला गेल्यामुळे उर्मिला त्या दिवशी एकट्याच घरी होत्या. त्यामुळे ही संधी साधून चोरट्यांनी हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी