Join us  

Rakhi Sawant : "तो माझा वापर करत राहिला आणि मी इस्लाम..."; राखीने दिला आदिलसोबतच्या निकाहाचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:17 PM

1 / 10
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. राखीने रितेश सिंहपासून वेगळी झाल्याची घोषणा केल्यानंतर व्यावसायिक आदिल खान दुर्रानीशी निकाह केला. तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार निकाह केला आणि इस्लाम धर्म स्वीकारला.
2 / 10
फातिमा नाव असल्याचं देखील सर्वांना सांगितलं. त्यांच्यातील नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. निकाहानंतर राखी आणि आदिलमध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्यानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले. दरम्यान, आदिल तुरुंगातही होता.
3 / 10
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखीवर अनेक आरोप केले, ज्याला अभिनेत्रीनेही चोख उत्तर दिले. आता राखीने पुन्हा एकदा आदिलसोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
4 / 10
आदिल खान दुर्रानी तिला काम मिळवून देण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. राखीने पुराव्यासह आदिलसोबतच्या तिच्या निकाहाचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
5 / 10
राखीने आदिलला काम मिळावे या मागणीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. राखीने इन्स्टाग्रामवर तिच्या आणि आदिलमधील काही जुन्या पर्सनल चॅट्सचा खुलासा केला आहे, जिथे मेसेजमध्ये आदिल इंडस्ट्रीत काम मागताना दिसत आहे.
6 / 10
स्क्रीनशॉट शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला माहित होतं की बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सर्व काही केलं आहे. लोकप्रियतेसाठी माझा वापर केला, मी इस्लामिक नियमांचे पालन केलं आणि आता त्याने माझा विश्वासघात केला.'
7 / 10
राखीने उर्दू भाषेत लिहिलेल्या दुसर्‍या पोस्टमध्ये तिचं मॅरेज सर्टिफिकेट देखील शेअर केले आहे. यासोबतच राखी आणि आदिल एकमेकांसोबत निकाह करत असल्याचा व्हि़डीओ देखील आहे. सर्टिफिकेटवर फातिमा स्पष्टपणे दिसत आहे.
8 / 10
राखीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, अरे मित्रांनो, हे माझं त्या दिवशीचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. मी त्याच्याशी लग्न केलं आहे. तिथे माझं नाव फातिमा असं लिहिलं आहे आणि माझा मूर्ख नवरा सर्वांना सांगत आहे की मी मुस्लिम नाही, त्याची लाज वाटते.
9 / 10
राखी आणि आदिल या दोघांनीही गेल्या काही महिन्यांत अनेक पत्रकार परिषदा घेऊन आपली मतं मांडली आहेत. त्यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने आपल्याला ड्रग्स दिल्याचा आणि कबुलीजबाबचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आदिलने दावा केला.
10 / 10
राखीने सांगितले की, आदिलने यापूर्वी अनेक विवाह केले आहेत आणि विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. राखीने आदिलवर तिचे न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून मोठ्या रकमेत विकल्याचा आरोप केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :राखी सावंत