By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:18 IST
1 / 10बॉलिवूडचा कॉमेडी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. ९ कोटींचा चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवने तिहार जेलमध्ये सरेंडर केलं. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावली. 2 / 10राजपाल यादवला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. मध्यमवर्गातून आलेल्या राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. 3 / 10पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपाल अभिनयात आला होता. राजपालचं अवघ्या २०व्या वर्षी करुणा यांच्याशी लग्न झालं होतं. पण मुलीला जन्म देताना त्याच्या पत्नीचं निधन झालं. 4 / 10डिलिव्हरीनंतर दुसऱ्या दिवशी राजपाल त्याच्या पत्नीला भेटणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 5 / 10पत्नीच्या निधनानंतर राजपालने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून करिअरला सुरुवात केली. 6 / 10जवळपास ८ वर्षांनी त्याला जंगल सिनेमातून पहिला ब्रेक मिळाला. जो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. 7 / 10२००१ साली द हिरो सिनेमाचं शूटिंग करताना राजपालची भेट राधाशी झाली. 8 / 10त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढू लागली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. 9 / 10दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने राजपाल यादव आणि राधाने २००३ मध्ये लग्न केलं. राधा ही मुळची कॅनडाची आहे. 10 / 10राधाने राजपालच्या पहिल्या पत्नीच्या मुलीलाही आपलंसं केलं आणि तिचा सांभाळ केला. आताही राजपालच्या या कठीण काळात ती त्याच्यासोबत खंबीर उभी आहे.