By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:46 IST
1 / 8 सौंदर्य स्पर्धांतून हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन स्थिरावणा-या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे कल्पना अय्यर. ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारून कल्पना यांनी रुपेरी पडद्यावर आपलं स्थान मिळवलं.2 / 8 एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत कल्पना अय्यर या उत्कृष्ट डान्सर देखील होत्या. राजा हिंदुस्तानी चित्रपटातील परदेसी परदेसी या गाण्यामुळे आजही त्या ओळखल्या जातात. आजही जेव्हा 'रंभा हो' आणि 'हरी ओम हरी' सारख्या गाण्यांचे सूर कानावर पडतात, तेव्हा या अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. 3 / 8 कल्पना अय्यर यांनी १९७८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता, जिथे त्या प्रथम उपविजेत्या ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. याचवर्षात त्यांनी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या आणि त्यामध्ये टॉप १५ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं. सिनेविश्वात त्यांनी आयटम गर्ल आणि खलनायिकेच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. 4 / 8 अभिनेत्री कल्पना अय्यर त्यांच्या सिनेकारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेही तितक्याच चर्चेत राहिल्या. एकेकाळी त्यांचं नाव शोलेतील गब्बर म्हणजे अभिनेते अमजद खान यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. मात्र, हे नात्यांचं पुढे काहीच घडलं नाही.5 / 8 कल्पना अय्यर या शेवटच्या हम साथ साथ है चित्रपटात दिसल्या. त्यानंतर कल्पना यांना इंडस्ट्रीपासून अंतर ठेवलं.यामागे त्यांची काही वैयक्तिक कारणंही होती. चित्रपटांमध्ये कामे कमी मिळत असल्याने अभिनेत्रीने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला.6 / 8 त्यानंतर कल्पना यांनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. साल १९९९ पासून त्या दुबईमध्येत वास्तव्यास आहेत आणि तिथे एका रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.7 / 8मात्र, ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा संपर्कात असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स त्या यामार्फत शेअर करत असतात. 8 / 8अभिनेत्री कल्पना अय्यर यांचा लूक फार बदलला असून त्यांना प्रेक्षक ओळखूच शकले नाहीत.