Join us  

सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 3:03 PM

1 / 11
बॉलिवूड स्टार सनी देओलचा गदर २ देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.
2 / 11
गदर २ च्या प्री आणि पोस्ट प्रमोशनसाठी सनी देओल चाहत्यांमधेय येत आहे. अनेक ठिकाणी दौरे करत आहे. यावेळी चाहतेही आपल्या सनी पाजीसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.याच दरम्यान सनी देओलचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो एअरपोर्टवर दिसतोय. यात तो चाहत्यावर चिडलेला दिसतोय.
3 / 11
याच दरम्यान सनी देओलचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो एअरपोर्टवर दिसतोय. यात तो चाहत्यावर चिडलेला दिसतोय.
4 / 11
विमानतळावर अभिनेत्याचे अंगरक्षक चाहत्याला थांबवतात पण कसा तरी तो सनीसोबत फोटो काढण्यात यशस्वी होतो. पण व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फॅनसोबत फोटो काढत असताना सनी त्याच्यावर भडकताना दिसत आहे.
5 / 11
अरे लेना फोटो.. असे म्हणत सनी ओरडल्याचे दिसत आहे. यापूर्वी एका पोलीस शिपायाने सनी देओलकडे हात पुढे करत शेकहँड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, सनीने नम्रपणे शेअहँड नाकारला.
6 / 11
सनीचा हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावरुनही नेटीझन्सने सनी देओलला ट्रोल केलं होतं. आता, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
7 / 11
आता, नव्या व्हिडिओवरुन एका यूजरने लिहिले की, आम्ही तुमचा आदर करायचा, पण तुम्ही लोकांसोबत चुकीच्या पद्धतीने वागलात तर ते वाईट आहे.
8 / 11
दुसऱ्याने लिहिले, पाजींना राग आला, आणखी एकाने लिहिले, 'जर त्याला चाहत्यांचा आदर करत येत नसेल तर लोक त्याचे चित्रपट पाहायला का जातात?'
9 / 11
दरम्यान, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने सनी देओल आणि फॅन्सच्या सेल्फी व्हिडिओवर भाष्य केलं आहे. सनीची बाजून घेत कंगनाने सेल्फी संस्कृतील भयंकर असल्याचं म्हटलंय.
10 / 11
एकाकीपणात घडणारी अशी कोणतीही घटना एखाद्याच्या हेतूचे किंवा वर्तनाचे सूचक असू शकत नाही. आणि सेल्फी संस्कृती तर भयंकर आहे.
11 / 11
लोक आपल्या खूप जवळ येतात, आपण सर्व प्रकारच्या व्हायरल आणि व्हायरसच्या अधीन होतो. प्रेमात अनेक भाषा असतात सेल्फी आणि मिठी हेच एकमेव प्रेम नाही, असेही कंगानाने ट्विट करुन म्हटले होते.
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसिनेमाकंगना राणौतसोशल व्हायरल