Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका ते कोएना...! प्लास्टिक सर्जरीनं काहींचं नशीब बदललं, काहींचं करिअर संपलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:34 IST

1 / 8
प्रियंका चोप्रा आज ग्लोबल स्टार आहे. तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो बघा, तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. प्रियंकाने लिप आणि नोज जॉब सर्जरी केलीये. या सर्जरीनंतर प्रियंकाचं सौंदर्य खुललं तसंच तिचं नशीबही फळफळलं.
2 / 8
शिल्पा शेट्टीचे आधीचे फोटो पाहून तुम्हालाही ती हीच का? असा प्रश्न पडेल. शिल्पाने नाकाची सर्जरी केली आहे आणि स्वत: याची कबुलीही दिली आहे. सर्जरीनंतर शिल्पा पुरती बदलली अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इतकी...!
3 / 8
कंगना राणौत हिनेही प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला. पण तिची सर्जरी यशस्वी झाली. मग काय कंगनाच्या करिअरची गाडी सूसाट पळायला लागली.
4 / 8
राखी सावंतला लोक ड्रामा क्वीन म्हणून ओळखतात. पण आज राखीनं जे काही मिळवलं ते अपार कष्टानं कमावलेलं आहे. राखीने चेहºयाची प्लास्टिक सर्जरी केलीय. अगदी बे्रस्ट सर्जरीही केलीये. यानंतर राखीचा चेहराच बदलला. पण तिचा हा लुक चाहत्यांनीही स्वीकारला.
5 / 8
साकी साकी या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली कोएना मित्रानेही चेहऱ्याची सर्जरी केली. पण या सर्जरीने तिचा चेहराच बिघडला. अगदी तिला इंडस्ट्रीत काम मिळणंही बंद झालं.
6 / 8
क्यूट आयशा टाकिया हिनेही लिप सर्जरी केलीये. पण या सर्जरीनंतर आयशा टाकियाचा अख्खा लूक बदलला आहे. सुरूवातीला तर तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.
7 / 8
2005 मध्ये मिनीषा लांबा हिने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषाचा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणं बंद झालं.
8 / 8
कमल हासन आणि सारिकाची लेक श्रुती हासन ही साऊथची मोठी अभिनेत्री. तिनेही नाकाची सर्जरी केली. या सर्जरीनंतर ती अधिक सुंदर दिसू लागलीये. अशात तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली नसेल तर नवल.