"तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची संधी..." प्रियंका चोप्राची पती निकसा्ठी खास पोस्ट, प्रेम व्यक्त करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:17 IST
1 / 10Priyanka Chopra-Nick Jonas: बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनास ही एक लोकप्रिय जोडी आहे.2 / 10 नुकताच निकने १६ सप्टेंबर रोजी आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी प्रियंकाने आपल्या पतीसाठी एक गोड पोस्ट शेअर केली असून त्यात तिने निकसोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.3 / 10प्रियंकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, निकसोबत घालवलेला प्रत्येक १६ सप्टेंबर तिच्यासाठी खास आहे आणि ती स्वतःला भाग्यवान समजते की गेल्या अनेक वर्षांपासून ती हा दिवस निकसोबत साजरा करत आहे.4 / 10प्रियंकाने लिहलं, 'आज तुझा वाढदिवस साजरा करताना, मी मागच्या प्रत्येक सुंदर १६ सप्टेंबरच्या आठवणींमध्ये रमले आहे. मला तुझ्यासोबत साजरं करण्याचं भाग्य लाभलं. तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खरं तर, आपण तुला रोजच साजरे करतो'. 5 / 10या पोस्टमध्ये प्रियंकाने २०१८ पासून आतापर्यंतचा तिचा आणि निकचा एकत्रित प्रवास कसा सुंदर होता, हे सांगितले आहे. 6 / 10निक आणि प्रियंकाची लव्ह स्टोरी कोणत्याही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही. प्रियंकाशी लग्न करून निक भारताचा जावई झाला खरा. पण ११ वर्षांनी लहान असणारा निक नेमका प्रियंकाच्या आयुष्यात कसा आला, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना इच्छा आहे.7 / 10प्रियंका आणि निकची पहिली ओळख एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. पहिल्याच भेटीनंतर निकने प्रियंकाला थेट मेसेज केला. यानंतर, दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.8 / 10त्यावेळी प्रियंका ३६ वर्षांची होती आणि निक फक्त २५ वर्षांचा होता. त्यांच्यात तब्बल ११ वर्षांचे मोठे अंतर होते. मात्र, भेटीगाठी वाढल्यावर तिला लक्षात आले की वयातील अंतर जास्त असले तरी निक खूप समजूतदार आहे, आणि त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढली. 9 / 10तिसऱ्या डेटसाठी दोघेही ग्रीसला गेले होते, जिथे निकने तिला एका गुडघ्यावर प्रपोज केले होते. १ डिसेंबर २०१८ रोजी या दोघांनी जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.10 / 10प्रियंका आणि निक सुखाचा संसार सुरू आहे. त्यांना मालती मेरी नावाची एक गोड मुलगीही आहे. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ती 'SSMB29' या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं दिग्दर्शन एस.एस. राजमौली करत आहेत