Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:47 IST

1 / 9
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. नुकतंच ती ४ दिवसांसाठी मुंबईत येऊन गेली. नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरचे उद्घाटन आणि तिच्या आगामी 'सिटाडेल' या हॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन यासाठी तिचा हा मुंबई दौरा होता.
2 / 9
प्रियंकाच्या मुंबई दौऱ्यात तिची चिमुकली मालती मेरीने (Malti Mary) सर्वांचंच लक्ष वेधलं. लेकीच्या जन्मानंतर प्रियंका पहिल्यांदाच भारतात आली होती. त्यामुळे छोटी मालती मेरी पहिल्यांदाच मुंबईत आली. तिच्या क्युटनेसने सर्वांनाच प्रेमात पाडलं.
3 / 9
मुंबई दौऱ्यात प्रियंकाने लेक मालतीसोबत सिद्धीविनायकाचेही दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
4 / 9
चार दिवसांनंतर प्रियंका पुन्हा अमेरिकेला परतली आहे. तिने कुटुंबासोबत ईस्टर (Easter Day) साजरा केला. यानिमित्ताने प्रियंकाने मालती मेरीचे आणखी क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडलेत.
5 / 9
पांढऱ्या टीशर्टमध्ये मालती मेरीचा हा फोटो आहे. त्यावर फर्स्ट ईस्टर असं लिहिण्यात आलंय. प्रियंकाचा मालतीसोबतचा हा क्युट सेल्फी बघून चाहत्यांची नजरच हटत नाही.
6 / 9
तर दुसऱ्या फोटोत मायलेकी ट्विनिंग लुक मध्ये दिसत आहेत. दोघींनी एकसारखाच टॉप घातला आहे. प्रियंकाने हा मिरर सेल्फी शेअर केला आहे.
7 / 9
आणखी एका फोटोत चिमुकल्या मालतीच्या हातात ईस्टर एग दिसतंय. तर आजुबाजुला तिची बरीच खेळणी दिसत आहेत.मालती ईस्टर संडे एन्जॉय करताना दिसत आहे.
8 / 9
ईस्टरसाठी मालती मेरीला प्रियंकाने खास तयार केलेलं दिसतंय. पिवळ्या रंगाचा फ्रॉक आणि केसांना पांढऱ्या रंगाचं फ्लॉवर हेअरबँड लावलेलं आहे. तर आजुबाजुला फुलांचे गुच्छ आहेत.
9 / 9
तर शेवटच्या फोटोत मालची गार्डनमध्ये खेळताना दिसत आहे. पेट डॉगसोबत ती एंजॉय करताना दिसत आहे. ईस्टरनिमित्त प्रियंकाने मालतीच्या मेरीची ही क्युट फोटो सिरीज अपलोड केली आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रापरिवारनिक जोनासव्हायरल फोटोज्