By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:13 IST
1 / 8ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पती निक जोनससोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.2 / 8खरंतर, अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथे दोघेही खूप स्टायलिश लूकमध्ये दिसले.3 / 8या लूकमधील अनेक फोटो प्रियांकाने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासाठी एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.4 / 8प्रियांकाने लाँग डीपनेक ब्लेझरसोबत मॅचिंग फ्रिल स्कर्ट परिधान केला आहे. अभिनेत्रीने आपला लूक मिनिमल मेकअप, ब्राऊन न्यूड लिपस्टिक आणि हाय हील्ससह पूर्ण केला आहे.5 / 8काही फोटोंमध्ये प्रियांका पती निकच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसत आहे. या फोटोत दोघेही एकमेकांना किस करताना दिसले.6 / 8हे फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, 'सप्टेंबरची एक छान रात्र.' या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.7 / 8प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दोघांनी आधी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आणि नंतर हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले.8 / 8आज हे पॉवर कपल एका गोंडस मुलीचे पालक आहेत. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी जोनस ठेवले आहे.