PICS : फॅशनच्या नादात अनेकदा झाले प्रियंका चोप्राचे हसे, या ड्रेसमुळे झालीये ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 08:00 IST
1 / 9फॅशनच्या बाबतीत प्रियंका चोप्राला तोड नाहीच. पण अनेकदा चित्रविचित्र फॅशन व ड्रेसमुळे ती ट्रोल होते. अलीकडे प्रियंकाने एक युनिक ड्रेस कॅरी केला आणि काय तर सोशल मीडियावर ‘मीम्ससेना’ लगेच अॅक्टिव्ह झाली. कुणी प्रियंकाच्या ड्रेसला सुतळी बॉम्ब म्हटले तर कुणी हॉट एअर बलून. कुणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत. 2 / 9गतवर्षी ग्रॅमी अवार्ड सोहळ्यात प्रियंका बेंबीपर्यंत उघडा ड्रेस घालून पोहोचली होती, त्यावेळीही ती अशीच ट्रोल झाली होती.3 / 92019 साली मेट गाला अवार्ड शोमध्ये तर पीसी अशा काही अवतारात पोहोचली होती, पुढे अनेक दिवस तिच्या या ड्रेसवरचे जोक्स व मीम्स सोशल मीडियावर फिरत होते. कुणी तिला चुडैल म्हटले होते तर कुणी भूत. एका युजरने तर तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशीसोबत केली होती.4 / 9प्लंजिंग नेकनाईन असलेला ब्लेजर ड्रेसमुळेही प्रियंका अशीच ट्रोल झाली होती.5 / 92019 मध्ये प्रियंकाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. यात तिने साडी नेसली होती. पण ब्लाऊज घातले नव्हते. ब्लॅकलेस पोजमधील तिचे फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल केले होते.6 / 92017 मध्ये मेट गाला इव्हेंटमध्येही प्रियंकाने असा काही ड्रेस निवडला होता की, त्यावरचे अनेक मीम्स व्हायरल झाले होते.7 / 92018 च्या मेट गाला अवार्डमध्ये मखमली ड्रेस पाहूनही लोकांनी तिची मजा घेतली होती.8 / 9बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. 9 / 9प्रियंका चोप्राने गेल्या काही वर्षांमध्ये मोनोक्रोमैटिक्स आउटफिट्स, सेक्सी ड्रेसेस, पेन्सिल गाउन्स आणि हाय स्लिट्समधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र ब-याचदा स्टायलिश दिसण्याच्या नादात प्रियंकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.