By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 14:09 IST
1 / 8'मिस वर्ल्ड' या सौंदर्य स्पर्धेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. प्रियंकाने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील यशानंतर प्रियंका आता हॉलिवूडमध्येही चांगलं काम करत आहे. 2 / 8प्रियंका पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत खूप दिवसांपासून आहे. ती भारतापासून दूर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. याच दरम्यान, तिच्या पतीने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 3 / 8निक जोनस बऱ्यात वर्षांपासून टाइप 1 डायबेटीसशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत प्रियंका नेहमीच त्याची विशेष काळजी घेते. निक जोनसने aol.com शी संवाद साधताना त्याच्या आरोग्याविषयी बरंच काही सांगितलं आहे.4 / 8निकने त्याची प्रेमळ पत्नी प्रियंका चोप्राबद्दलही मनातल्या भावना व्यक्त केल्या. रिपोर्टनुसार, निकने सांगितलं की, तो आता मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसलाही या आजाराबद्दल सांगण्याचा विचार करत आहे. 5 / 8सुरुवातीच्या काळात, जेव्हा मुलीसोबत घरात खेळायचो तेव्हा ब्लड शुगर कमी व्हायची, त्यामुळे तिला जास्त वेळ देता यायचा नाही असं निकने म्हटलं आहे. तसेच त्याने यावर विचार केला असून तो एक दिवस मुलीला या समस्येबद्दल नक्कीच समजावून सांगेल असंही म्हणाला. 6 / 8निकने पुढे त्याची पत्नी अभिनेत्री प्रियंका चोप्राचं कौतुक केलं आणि सांगितले की, जेव्हाही तो आउटिंगला जातो किंवा कॉन्सर्टमध्ये जातो तेव्हा प्रियंका नंबर्स App द्वारे त्याची ब्लड शुगर एक्सेस करते.7 / 8जेव्हा जेव्हा त्याला त्याची शुगर लेव्हल जास्त असल्याचं जाणवतं तेव्हा तो प्रियंकाला अलर्ट करतो. प्रियंकाचे कौतुक करताना तो म्हणाला की, ती केवळ त्याच्या डायबेटीसबाबतच अलर्ट राहत नाही, तर एक पालक म्हणून तिला कोणत्याही परिस्थितीत काय करायचे हेही माहीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 8