बर्फात रोमान्स करताना दिसले प्रियंका चोप्रा आणि निक जोनस, व्हायरल झाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:45 IST
1 / 9प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीतील आवडते जोडपे आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. अशा परिस्थितीत, व्हॅलेंटाईन वीकमध्ये जोडपे त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करणार नाहीत हे शक्यच नाही. 2 / 9अलीकडेच निक जोनासने पत्नी प्रियंकासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.3 / 9निक आणि प्रियांका सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतित करत आहेत. प्रियंका आणि निक सोबत त्यांची लाडकी लेक मालती मेरी चोप्रा जोनस देखील दिसत आहे. हे सर्वजण बर्फात मस्ती करताना दिसत आहेत. 4 / 9निक आणि प्रियांका बर्फात एन्जॉय करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे तर तिने पांढरा जंपसूट घातला असून त्यावर लाल आणि निळ्या रंगाचे चेक प्रिंट आहेत. यासोबतच ग्रे शेड्सही कॅरी केले आहेत.5 / 9 दुसरीकडे, निक कॅपसह काळ्या आणि पांढऱ्या ट्रॅकसूटमध्ये देखणा दिसत आहे.6 / 9फोटोंमध्ये निक आणि प्रियंकासोबत मालतीही बर्फाचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. 7 / 9प्रियंका चोप्राने अखेर तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा गोंडस चेहरा दाखवला आहे. यादरम्यान मालती प्रियांकाच्या मांडीवर बसलेली दिसते आहे. मालतीचा चेहरा पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला.8 / 9मालती मेरी चोप्राचा चेहरा पाहून एका इंस्टाग्राम यूजरने कमेंट्सचा वर्षाव केला.9 / 9 चाहते म्हणाले - बेबी खरोखरच गोंडस आणि सुंदर आहे. अशाप्रकारे प्रियांकाच्या मुलीची पहिली झलक पाहून सर्व चाहते खूश झाले.