By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:00 IST
1 / 10बॉलिवुडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा आज ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ९०च्या दशकात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. दिल से या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. 2 / 10यानंतर सोल्जर, मिशन काश्मीर, कोई मिल गया, कल हो ना हो, संघर्ष अशा अनेक सिनेमांतून तिने अभिनयाची चुणूक दाखवली. पदार्पणातच तिला फिल्मफेअर डेब्यू अवॉर्डही मिळाला.3 / 10प्रिती झिंटा च्या गालावरच्या खळीवर अनेक जण अक्षरश: घायाळ झाले. अशी गोड दिसणारी प्रिती तेवढीच हिंमतीचीही होती हे एका घटनेवरुन लक्षात येते. तिने दाखवलेली हिंमत भल्याभल्यांना दाखवता आली नाही.4 / 10प्रिती एका प्रसंगी थेट अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला भिडली होती. तिला मिळत असलेल्या धमक्यांना न घाबरता तिने कोर्टात हजर राहून विरोधात साक्ष दिली होती.5 / 10हा किस्सा आहे चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटावेळेसचा. चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमक्या येत होत्या. प्रिती यामुळे काहीशी घाबरली होती.6 / 10त्यावेळी अनेक कलाकारांना अशा धमक्या येत होत्या. सलमान खान, शाहरुख खान, महेश मांजरेकर, राकेश रोशन यांनाही धमकीचे फोन आले होते. मात्र कोणीच त्याविरोधात आवाज उठवला नाही.7 / 10अशावेळी एकट्या प्रितीने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलविरोधात कोर्टात जाऊन साक्ष दिली. मला धमकीचे फोन आल्याचं तिने कोर्टात सांगितलं आणि काहीच क्षणात बातमी टीव्हीवर झळकली.8 / 10धमक्यांपर्यंत ठीक होतं मात्र जेव्हा छळ व्हायला लागला तेव्हा मात्र मी लगेच आवाज उठवला असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.माझ्यामागे कुटुंब, मुलं नव्हती म्हणून मी हा धाडसी निर्णय घेतला असंही ती म्हणाली.9 / 10अब्बास मस्तान दिग्दर्शित चोरी चोरी चुपके चुपके सिनेमासाठी छोटा शकीलनेही पैसा लावल्याची चर्चा तेव्हा होती.प्रितीच्या धाडसाचे नंतर खूप कौतुक झाले.10 / 10प्रिती ही फक्त अभिनेत्री नसून ती एक यशस्वी व्यावसायिका आहे. ती independent women आहे. तिने इंग्लिश ऑनर्स आणि क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे.