Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंट अनुष्का शर्माचे ‘वोग’साठी बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून व्हाल ‘क्लिन बोल्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 11:44 IST

1 / 10
प्रेग्नंट अनुष्का शर्मा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर प्रेग्नंसीकाळात वोग इंडिया या मॅगझिनसाठी तिने केलेले फाटोशूट.
2 / 10
होय, तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
3 / 10
बोल्ड अवतारातील बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे तिचे हे फोटो पाहताना नजर हटत नाही.
4 / 10
‘वोग इंडिया’च्या जानेवारी 2021च्या एडिशनसाठी अनुष्काने हे खास फोटोशूट केले. यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.
5 / 10
अनुष्काचे हे फोटो पाहिल्यानंतर विराट कोहलीनेही कमेंट केली आहे. अतिसुंदर असे त्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिले.
6 / 10
अनुष्का आणि तिचा पती विराट कोहली दोघेही बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत.
7 / 10
आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 आॅगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
8 / 10
विराट सध्या पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात आला आहे. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे.
9 / 10
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.
10 / 10
या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटली मध्ये लग्न केले.
टॅग्स :अनुष्का शर्मा