Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूल नको म्हणून पूजा भटने मोडला होता ११ वर्षांचा संसार, कोण आहे अभिनेत्रीचा Ex husband?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:40 IST

1 / 9
'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री पूजा भटने (Pooja Bhatt) सहभाग घेत सर्वांनाच धक्का दिला. महेश भट यांची मुलगी आणि ९० च्या दशकात 'सडक','दिल है के मानता नही' सारख्या सिनेमांतील अभिनयासाठी ती ओळखली जाते.
2 / 9
पूजा भट बराच काळ अभिनयापासून गायब आहे. याऐवजी ती दिग्दर्शन, निर्माती म्हणून काम पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सिगरेटचं व्यसन कसं लागलं होतं आणि ४२ व्या वर्षी व्यसनावर कशी मात केली याचा खुलासा केला. बिग बॉसच्या घरातच ती यासंदर्भात मोकळेपणाने बोलली.
3 / 9
आता लेटेस्ट एपिसोडमध्ये पूजाने तिच्या लग्नाविषयी आणि घटस्फोटाविषयी खुलासा केला आहे.पूजाचा पती नेमका कोण होता आणि त्यांचा घटस्फोट का झाला याविषयी पूजा घरातील सदस्य बेबिका धुर्वेशी गप्पा मारताना दिसत आहे. तुझं लग्न झालं आहे का असा प्रश्न बेबिका पूजाला विचारते.
4 / 9
पूजा म्हणाली,'त्याचं नाव मनीष माखिजा. आमच्या लग्नाला ११ वर्ष झाले होते. नंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला लक्षात आलं की काहीच ठीक नाहीए आणि एकमेकांशी खोटं का बोलायचं. ही कोणती ड्रेस रिहर्सल नाही, इथे केवळ एकच संधी मिळते.'
5 / 9
बेबिकाने पूजाच्या आधीच्या पतीविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली,'तो अभिनेता नव्हता पण मीडियाशी जोडलेला होता आणि माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. 2003 मध्ये आम्ही लग्नगाठ बांधली आणि ११ वर्षांनंतर 2014 मध्ये आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
6 / 9
बेबिकाने पूजाला मनीषचा जन्ममहिना कोणता ते विचारलं. यावर पूजा म्हणाली,'त्याची मकर रास होती. म्हणूनच आम्ही एकमेकांसोबत खूप चांगले होतो.' यावर बेबिका म्हणाली,'मकर राशीचे खूप व्यावहारिक असतात.ते खूप चांगले वडील बनतात. '
7 / 9
नंतर पूजा म्हणाली,'तेव्हा माझं डोकं ठिकाणावर नव्हतं. त्याला मूल हवं होतं. मात्र मला तेव्हा बाळाचा विचार करायचा नव्हता. आणि आता मला मुलं आवडतात.'
8 / 9
जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु होतो. मला ते नको होतं. जे काही होतं ते खूप छान होतं. आम्ही आमच्या मर्यादा पाळल्या आणि मार्ग वेगळे केले, असंही ती म्हणाली.
9 / 9
मनीष मखिजा व्हीजे आहे. तसंच मुंबईत एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचा तो मालकही आहे. पहिल्याच भेटीनंतर पूजा आणि मनीष एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं. दोघांनी केवळ २ महिने डेट केले आणि २००३ मध्ये लग्नबंधनात अडकले. ११ वर्षांनंतर 2014 साली दोघांचा घटस्फोट झाला.
टॅग्स :पूजा भटमहेश भटपरिवारलग्नघटस्फोटबिग बॉस