Join us

PICS : अनेक महिन्यानंतर घराबाहेर पडली रिया चक्रवर्ती, टी-शर्टवरील मॅसेजने अख्ख्या जगाला दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 15:58 IST

1 / 9
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती अनेक महिन्यांनंतर मुंबईत स्पॉट झाली.
2 / 9
रियासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीही दिसला. दोघा बहिणभावांना एकत्र पाहून मीडियाने त्यांच्याभोवती गराडा घातला.
3 / 9
सध्या रिया मुंबईत घर शोधतेय. सोसायटीने रियाच्या कुटुंबियांना फ्लॅट खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे सध्या रियाचे कुटुंबिय नवीन घराच्या शोधात आहेत.
4 / 9
कालपरवा रियाचे आईवडिल घर शोधताना दिसले होते. आज रिया व तिचा भाऊ घराच्या शोधात मुंबईत भटकताना दिसले.
5 / 9
यावेळी रियाच्या पिंक कलरचे टी-शर्ट घातले होते. त्यावरच्या मॅसेजने सगळ्यांचे लक्ष वेधले.
6 / 9
प्रेम हीच शक्ती आहे, असा मॅसेज या टी-शर्टवर प्रिंट केलेला होता. तिच्या या टी-शर्टची सध्या खास चर्चा रंगलीये.
7 / 9
सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
8 / 9
यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाव तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती.
9 / 9
सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर पडली. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.
टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत