Join us

PHOTOS: महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो राष्ट्रीय पुरस्कार विजेता सूर्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:23 IST

1 / 8
दक्षिणेचा सुपरस्टार सूर्या आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवसाचं गिफ्ट खरं तर सूर्याला आदल्या दिवशीच मिळलं आहे असे म्हटलं तर हरकत नाही. सूर्या काल शुक्रवारी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
‘सुरूराई पोटू’ (Soorarai Pottru) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सूर्या मिळाला. त्यामुळे आजचं बर्थ डे सेलिब्रेशन त्याचं जोरदार असेल यात काही शंका नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
सुपरस्टार सुर्याचा जन्म 1975 साली झाला. 1997 मध्ये आलेल्या 'नेररुक्कू नेर' या थ्रिलर चित्रपटातून या अभिनेत्याने ग्लॅमरच्या दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार सुर्या प्रत्येक चित्रपटासाठी 25-30 कोटी रुपये घेतात.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
अभिनेता सूर्याच्या इन्कम सोर्स फक्त त्याचे चित्रपटच नाही तर प्रोडक्शन हाऊस 2D एंटरटेनमेंट, टीव्ही होस्टिंग आणि इतर ब्रँड एंडोर्समेंट देखील तिचे इन्कम सोर्स आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
सुपरस्टार सूर्यालाही गाड्यांची प्रचंड आवड आहे. यामुळेच अभिनेत्याकडे लक्झरी कारचे कलेकश्न आहे .(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
सूर्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता 250 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. कोट्यवधींचा बंगला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
सूर्याच्या या लक्झरी कारच्या कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, जॅग्वार एक्सएफ, ऑडी ए7, मर्सिडीज बेंझ एमएल क्लास आणि ऑडी क्यू7 सारख्या कारचा समावेश आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी