Join us

बाबूभैय्याकडे केळं मागणारी 'ती' छोटी मुलगी आठवतेय? २७ वर्षांनंतर आता दिसते अशी की, आश्चर्य वाटेल

By देवेंद्र जाधव | Updated: October 5, 2025 16:54 IST

1 / 7
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणारी निरागस मुलगी तुम्हाला आठवत असेल.
2 / 7
बाबूभैय्याकडे केळं मागणारी ही क्यूट मुलगी सर्वांना आवडून गेली. या छोट्या मुलीचं नाव आहे अँजलिना इदनानी. अँजलिना आता मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय.
3 / 7
'फिर हेरा फेरी' मध्ये अँजलिनाने बिपाशा बसूच्या भाचीची भूमिका साकारली होती. अँजलिना आता २७ वर्षांची झाली आहे आणि ती सध्या दुबईमध्ये राहते.
4 / 7
'फिर हेरा फेरी' नंतर अँजलिनाने 'ता रा रम पम' (Ta Ra Rum Pum) या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारली होती.
5 / 7
अभिनयात चांगली सुरुवात करूनही अँजलिनाने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती पुढे बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली नाही.
6 / 7
अँजलिना सध्या दुबईत स्थायिक झाली असू ती शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने फॅशन मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे आणि या क्षेत्रात आपले करिअर करत आहे.
7 / 7
अँजलिना आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणं पसंत करते. पण तिचे चाहते तिची पुन्हा चित्रपटात येण्याची वाट पाहत आहेत. अशाप्रकारे मोठ्या झालेल्या अँजलिनाला पाहून सर्वजण थक्क झालेत
टॅग्स :अक्षय कुमारपरेश रावलसुनील शेट्टीबॉलिवूड