By देवेंद्र जाधव | Updated: February 24, 2026 17:01 IST
1 / 7बाबूभैय्या फेम परेश रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. परेश रावल यांचा मुलगाही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल2 / 7परेश रावल यांच्या लेकाचं नाव आहे आदित्य रावल. आदित्य सध्या विविध माध्यमांत अभिनय करतो आहे. आदित्य वडिलांची ओळख न वापरता स्वतःच्या मेहनतीवर सिनेसृष्टीत स्थान निर्माण करत आहे.3 / 7आदित्य रावलने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. वडील परेश रावल यांच्याच ओह माय गॉड सिनेमासाठी आदित्यने काम केलं होतं.4 / 7पुढे आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत सिनेमासाठी आदित्यने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. याशिवाय फेरारी की सवारी सिनेमात आदित्यने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.5 / 7२०२० साली आलेल्या बमफाड सिनेमात आदित्य प्रमुख अभिनेता म्हणून पहिल्यांदाच झळकला. पुढे तिरंदाज या वेब शोमध्ये आदित्यने काम केलं.6 / 7२०२३ मध्ये आलेल्या प्राईम व्हिडीओवरील बंबई मेरी जान वेबसीरिजमध्ये आदित्यने छोटा राजनची छोटीशी तरीही महत्वपूर्ण भूमिका साकारली.7 / 7एकूणच वडिलांप्रमाणे आदित्यला हवी तशी लोकप्रियता मिळत नसली तरीही छोट्यामोठ्या भूमिका साकारुन आदित्य कलाक्षेत्रात सक्रीय आहे. लवकरच तो अनिल कपूर यांच्यासह सुबेदार सिनेमात झळकणार आहे.