Join us

"अवघ्या १५ व्या वर्षी मी रेड लाईट एरियात जायचे, कारण...", प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:26 IST

1 / 7
बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी शाळेत जायच्या वयात रेड लाईट एरियात जायची. या अभिनेत्रीचं नाव सोनम खान
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सोनम खानला आपण 'त्रिदेव' चित्रपटातील 'ओए-ओए' गर्ल म्हणून ओळखतो. सोनमने नुकतंच तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बालपणीचा थक्क करणारा अनुभव सांगितला आहे
3 / 7
वयाच्या १५ - १६ व्या वर्षी 'मिट्टी और सोना' या चित्रपटासाठी तयारी करत असताना सोनम रेड-लाइट एरियामध्ये जायची. तिथे जाऊन सोनम त्या भागातील महिलांशी संवाद साधायची.
4 / 7
'मिट्टी और सोना' या चित्रपटात सोनमने कॉलेज गर्ल आणि वेश्याव्यवसाय करणाऱी मुलगी अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. भूमिका पडद्यावर चांगली रंगवता यावी म्हणून सोनम रेड लाईट एरियात गेली होती.
5 / 7
रेड लाईट एरियात गेल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मनातील दुःख, भीती आणि असुरक्षिततेची भावना समजण्यास मदत झाली, असं सोनम खान म्हणाली. या गोष्टीचा फायदा सोनमला भूमिका साकारताना झाला
6 / 7
आजही सोनमने साकारलेली 'मिट्टी और सोना' सिनेमात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. वयाच्या १५-१६ व्या वर्षी सोनमच्या मनात भूमिका समजून घेण्याचं जे गांभीर्य होतं, याचं अनेकजण कौतुक करत आहेत.
7 / 7
सोनम खान इन्स्टाग्रावर सक्रीय असून तिचे ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोनम तिच्या सिनेमांचे किस्से आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
टॅग्स :सोनमबॉलिवूड