Join us

OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:50 IST

1 / 8
सध्या थिएटर रिलीजपेक्षा ओटीटी (OTT) रिलीजची अधिक चर्चा होताना दिसतेय. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. चला पाहूया, या आठवड्यात ओटीटीवर काय प्रदर्शित होणार आहे.
2 / 8
सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला 'धडक २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, पण आता तो ओटीटीवर येत आहे.
3 / 8
जातीय भेदभाव आणि सामाजिक दडपशाहीवर भाष्य करणारी ही कथा तमिळ चित्रपट 'परियेरुम पेरुमल'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ म्हणजेच उद्या डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) प्रदर्शित होत आहे.
4 / 8
अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan)चा बहुप्रतिक्षित सीक्वल 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) उद्या ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
5 / 8
'सन ऑफ सरदार २'मध्ये रवी किशन, कुब्रा सैत, संजय मिश्रा, चंकी पांडे, नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, दीपक डोब्रियाल, शरत सक्सेना, अश्विनी काळसेकर आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'धडक २' सोबत टक्कर दिली होती. तुम्ही 'सन ऑफ सरदार २' हा चित्रपट उद्या Netflixवर पाहू शकता.
6 / 8
'हृदयपूर्वम' (Hridayapoorvam) हा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका असलेला हा एक मल्याळम कौटुंबिक ड्रामा आहे. हा चित्रपट तुम्ही उद्या जिओ सिनेमा (JioCinema)वर पाहू शकता.
7 / 8
Sumathi Valavu हा हॉरर-कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. उद्या २६ सप्टेंबर २०२५ पासून हा चित्रपट झी५ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ मल्याळम भाषेतच नाही, तर हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध असणार आहे.
8 / 8
अडीच तासांचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. १४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील यशासोबतच या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ चे रेटिंग मिळाले आहे.
टॅग्स :सिनेमाबॉलिवूडअजय देवगणतृप्ती डिमरीTollywood