तरुणाईची 'दिल की धडकन' बनतेय नोरा फतेही, तिच्या प्रत्येक फोटोंंवर देतात अशा कमेटंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 12:36 IST
1 / 9नोरा फतेही बॉलिवूडची सर्वांत हॉट गर्ल बनली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नोराचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.2 / 9 नोराचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात. फोटो शेअर होताच चाहत्यांच्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.3 / 9अलीकडेच नोराने साडी परिधान करत फोटोशूट केले, साडीतील तिच्या अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा झाले. 4 / 9वेस्टर्न असो वा पारंपरिक नोराचा स्टाईलसेंस तिच्या डान्सइतकीच अप्रतिम आहे. 5 / 9नोरा सलमान खानच्या 'भारत' सिनेमात दिसली होती. त्याआधी ती 'साकी साकी रे आणि ‘दिलबर दिलबर’ गाण्यामुळे चर्चेत आली होती. 6 / 9 हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं होतं की आतापर्यंत १२ कोटींहून जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले होते.7 / 9 आत्तापर्यंत ती 'दिलबर' गाण्यावर दोन वेगवेगळ्या भाषेत थिरकली आहे. 8 / 9 ग्लॅमरस ड्रेसपासून ते साडीपर्यंत तिचे लूक पाहून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.9 / 9सोशल मीडियावर सध्या तिच्या डान्सिंग स्टाइलने ती सा-यांनाच घायाळ करत आहे.