Join us
Daily Top 2Weekly Top 5

PICS : नीना गुप्ताच्या लेकीचा थाट तर बघा, मसाबा गुप्ता सब्यसाचीसाठी बनली मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:35 IST

1 / 9
अभिनेत्री नीना गुप्ता यांना सगळेच ओळखतात. पण नीना यांची लेक मसाबा गुप्ता हिचेही बॉलिवूडमध्ये मोठे वजन आहे. बॉलिवूडच्या दिग्गज फॅशन डिझाईनरमध्ये तिचे नाव घेतले जाते. हीच मसाबा सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
2 / 9
होय, सब्यसाची यांच्या नव्या ब्रायडल कलेक्शनसाठी मसाबाने एकदम रॉयल फोटोशूट केले आहे.
3 / 9
या फोटोंमधील मसाबाचा थाट तर पाहातच राहावा असा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवनवे लूक डिझाईन करणा-या मसाबाने यावेळी सब्यसाचीच्या कलेक्शनसाठी मॉडेलिंग केले आहे.
4 / 9
काही फोटोत घेरदार लेहंगा तर काही फोटोत फ्लोरल डिझाईनची साडी तिने नेसली आहे.
5 / 9
एका मासिकासाठी करण्यात आलेले मसाबाचे फोटोशूट सध्या जाम चर्चेत आहेत.
6 / 9
मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही.
7 / 9
मसाबाने 2015 मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. 2018मध्ये दोघांनी घटस्फोटोसाठी अर्ज केला आणि 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
8 / 9
मधुपासून विभक्त होण्याचा लेक मसाबाचा निर्णय नीना गुप्तांसाठी धक्कादायक होता. एका मुलाखतीत त्या याबद्दल बोलल्या होत्या
9 / 9
‘एक आई या नात्याने मी मसाबाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. घाई करू नकोस, विचारपूर्वक निर्णय घे, असे मी तिला सांगितले होते. कारण आम्हाला मधु आवडतो. तो एक चांगला माणूस आहे. पण काहीही तोडगा निघाला नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. पण तरीही तिचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता,’ असे नीना यांनी सांगितले होते.
टॅग्स :नीना गुप्ता