Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? १५ व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत 'शोरा'ची चर्चा, अभिनेत्री होण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:48 IST

1 / 7
नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीनने आजवर विविध बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीची लेक सुद्धा ग्लॅमरच्या दुनियेत सक्रीय असून तिला पाहताच सर्वजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे.
2 / 7
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीचं नाव शोरा असं आहे. शोरा अवघी १५ वर्षांची आहे. शोरा नुकतीच वडिलांसोबत एका इव्हेंटला गेली होती. त्यावेळी शोराला पाहताच सर्वजण आश्चर्यचकीत झालीये
3 / 7
सुंदर डोळे, बोलका चेहरा आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे शोरा या इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरेत आली. शोरा अनेकदा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत भटकंती करताना आणि सिनेमे बघायला जाते.
4 / 7
शोराला सुद्धा वडिलांप्रमाणे सिनेमात करिअर करायचं आहे. तिला अभिनयाचीही आवड आहे. वडिलांनी दिलेली अभिनयाची शिकवण जोपासून भविष्यात शोरालाही फिल्म लाईनमध्ये उतरायचं आहे.
5 / 7
शोराचे सोशल मीडियावर ७ हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. शोरा सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
6 / 7
काही वर्षांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं होतं. त्यावेळी शोरा शांतपणे आणि संयमीपणाने वडिलांच्या पाठीशी उभी राहिली
7 / 7
शोरा ही नवाजुद्दीन सिद्दीकीची लाडकी लेक आहे. नवाजुद्दीन अनेकदा लेकीसोबत देशात आणि परदेशात भटकंतीला जात असतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून तो लेकीसाठी वेळ काढत असतो.
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडसेलिब्रिटी