Join us

"विकी प्लीज" म्हणणाऱ्या श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? 'स्त्री' सिनेमाच्या व्हायरल स्क्रीप्टमधून झाला उलगडा

By देवेंद्र जाधव | Updated: March 25, 2025 12:48 IST

1 / 7
श्रद्धा कपूरचं नाव उच्चारलं की आठवते 'स्त्री' सिनेमातील तिची भूमिका.'स्त्री' सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये श्रद्धाने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं.
2 / 7
विकी प्लीज म्हणत सिनेमातील विकी जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या भूमिकेत श्रद्धा दिसली. अभिनेत्रीच्या या भूमिकेचं कौतुक झालं.
3 / 7
'स्त्री' सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये जो प्रश्न सिनेमातील विकीला पडला तोच प्रश्न प्रेक्षकांच्याही मनात आहे. तो म्हणजे श्रद्धा कपूरने 'स्त्री'मध्ये साकारलेल्या भूमिकेचं नाव काय
4 / 7
अशातच 'स्त्री' सिनेमाच्या पुढील भागाची अर्थात 'स्त्री ३' ची स्क्रीप्ट व्हायरल झाली आहे. या स्क्रीप्टमध्ये श्रद्धाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा झालाय.
5 / 7
'स्त्री ३'च्या व्हायरल स्क्रीप्टकडे नजर गेल्यास कळून येतं की, श्रद्धा गायत्री नावाची भूमिका साकारत आहे.
6 / 7
अशाप्रकारे 'स्त्री' सिनेमाच्या फ्रँचायजीमध्ये श्रद्धा कपूर 'गायत्री' ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे जेव्हा 'स्त्री'चा पुढील भाग रिलीज होईल, तेव्हा श्रद्धाच्या भूमिकेच्या नावाचा उलगडा होईल
7 / 7
'स्त्री ३' हा सिनेमा १३ ऑगस्ट २०२७ ला रिलीज होणार आहे. त्याआधी मॅडॉक प्रॉडक्शन हॉरर युनिव्हर्समधील पुढील सिनेमे रिलीज करण्याच्या मार्गावर आहेत.
टॅग्स :श्रद्धा कपूरराजकुमार रावबॉलिवूड