By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:00 IST
1 / 8 हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नाव आवर्जुन घेतलं जाते.2 / 8 मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी फार गाजली होती. याच चित्रपटाताली देख ले हे गाणं सुद्धा त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातून मुमैत खान हे नाव रातोरात प्रसिद्धीझोतात आलं. या चित्रपटात मुमैत एक आयटम सॉन्ग करताना दिसली होती.याच चित्रपटानंतर तिचं नशीब फळफळलं आणि मुमैतसाठी इंडस्ट्रीचे द्वार खुले झाले. 3 / 8 मात्र, एकेकाळी यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आणि इंडस्ट्रीपासून दुरावली.4 / 8 काही काळापूर्वी मुमैतचा एक अपघात झाला होता. या अपघातानंतर ती १५ दिवस कोमात होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्या अपघाताविषयी सांगितलं. शिवाय तिने इंडस्ट्रीतून गायब झाल्याच्या अफवांनाही पूर्णविराम दिला. 5 / 8 iDream Media सोबत संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, 'मी इंडस्ट्री सोडली नाही. माझा अपघात झाला होता. तो अपघात इतका भीषण होता की माझ्या मेंदूतील पाच नसा फाटल्या. त्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितलेलं मी किमान सात वर्षे काम करु नये. माझ्यासाठी एखादी अवजड वस्तू देखील उचलणं अशक्य होतं. 6 / 8 मग ती म्हणाली,'त्यावेळी मला फिट यायची,त्यावर माझे औषधोपचार सुरु होते. ज्यामुळे माझं वजन खूप वाढलं. त्या सात वर्षात मी खूप काही सहन केलं. त्या सात वर्षांत, माझ्याकडे विचार करण्यासाठी खूप वेळ होता. मला जाणवलं की मला मेकअप आणि हेअर स्टाईलिंगची खूप आवड आहे.'असा खुलासा अभिनेत्रीने केला.7 / 8 यानंतर तिने हैदराबादमध्ये 'वेलाईक अकादमी'नावाची अकादमी सुरु केली. सध्या अभिनेत्री आपल्या या प्रोफेशनमध्ये व्यस्त आहे. 8 / 8 मुमैतचे वडिल पाकिस्तानी होते आणि आई चेन्नईची राहणारी होती. मुमैतने हलचल, लकी, आणि राउडी राठोड सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. गरिबीत वाढलेल्या मुमैथने वयाच्या १३ व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली.बॉलिवूडसह मुमैतने तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.