Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:38 IST

1 / 10
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग 29 ऑगस्ट रोजी न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याच्या कायदेशीर टीमसह मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात पोहोचला. जिथे त्यांची सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, मीडियाची गर्दी टाळण्यासाठी रणवीरने सकाळची वेळ निश्चित केली होती. चौकशीदरम्यान रणवीरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
रणवीरच्या म्हणण्यानुसार, त्याने हे फोटोशूट सामान्य फोटोशूटप्रमाणे केले होते, त्याला कल्पनाही नव्हती की यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
रणवीर सकाळी 6.50 वाजता पोलिस स्टेशनला पोहोचला. जिथे त्याने आपला जबाब नोंदवला. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
रणवीरने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. रणवीरला त्याचा न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
ज्यावर अभिनेत्याने सांगितले की ज्यांनी हे शूट केले त्यांचा अजेंडा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा इतकाच होता. त्यामुळेच त्याने त्याचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
रणवीर म्हणाला, 'मी हे फोटो कोणाला दुखवण्यासाठी पोस्ट केलेले नाहीत.' (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
रणवीरने करार पूर्णपणे वाचला होता का?, त्याच्या न्यूड फोटोशूटचा करार कोणत्या कंपनीसोबत झाला होता?, हे फोटोशूट कुठे आणि केव्हा झाले?,या बोल्ड फोटोशूटसाठी रणवीरला किती पैसे मिळाले? अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आल्याचा सांगितले जात आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
22 जुलै 2022 रोजी रणवीरने पेपर मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते, ज्यामध्ये रणवीर न्यूड होता. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
रणवीरच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीपोलिस