Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल ठाकूरची व्हॅकेशन डायरी! कामातून ब्रेक घेत अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यात दंग, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:55 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर गेल्या काही काळापासून आपल्या कामात प्रचंड व्यग्र होती. मात्र, वर्षाच्या शेवटी तिने आपल्या बिझी शेड्युलमधून स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढला आहे.
2 / 7
सततची शूटिंग, प्रमोशनल इव्हेंट्स आणि धावपळीनंतर मृणाल सध्या व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
3 / 7
मृणालने एका गुपित ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला असून तिथले तिचे रिलॅक्स मूडमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 7
मृणालने तिच्या या ट्रिपची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची फ्रेश आणि शांत दिसत आहे. विशेषतः तिचा 'नो-मेकअप' आणि 'सन-किस्ड' लूक चाहत्यांना खूप भावला आहे.
5 / 7
फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'मच नीडेड' असे लिहिले आहे. यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून कुणी तिला 'क्यूट' म्हटले आहे, तर कुणी 'ब्यूटी क्वीन'.
6 / 7
मृणाल लवकरच ‘डकैत’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अदिवी शेष आणि अनुराग कश्यप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे हा मृणालचा पहिला चित्रपट आहे जो हिंदी आणि तेलगू अशा दोन्ही भाषांमध्ये शूट झाला आहे.
7 / 7
मृणाल तिच्या आगामी ‘दो दीवाने सेहर में’ या रोमँटिक चित्रपटामुळेही चर्चेत आहे. यात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रवी उद्यावर दिग्दर्शित हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूर