Join us

मि.परफेक्शनिस्ट झाला ५२ वर्षांचा...हॅप्पी बर्थडे टु यू....!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान ५२ वर्षांचा झाला. वांद्रे येथील त्याच्या घरी त्याने केक कापून सेलिब्रेशन केले. चाहते, हितचिंतक, फोटोग्राफर्स यांनी त्याच्या या छोट्याशा पार्टीला गर्दी केली होती. वाढदिवसाप्रसंगी आमिर खान अत्यंत खुश दिसत होता. तसेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी वजन घटवल्याचेही प्रकर्षाने लक्षात आले.

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान ५२ वर्षांचा झाला. वांद्रे येथील त्याच्या घरी त्याने केक कापून सेलिब्रेशन केले. चाहते, हितचिंतक, फोटोग्राफर्स यांनी त्याच्या या छोट्याशा पार्टीला गर्दी केली होती. वाढदिवसाप्रसंगी आमिर खान अत्यंत खुश दिसत होता. तसेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी वजन घटवल्याचेही प्रकर्षाने लक्षात आले.पांढऱ्या रंगाचा शर्ट, पीळदार मिशा आणि चेहºयावरील स्मित हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. केक कापताना त्याच्या मनातला आनंद त्याच्या चेहºयावरून प्रतिबिंबित होत होता.आमिर खानला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते आणि हितचिंतक उपस्थित झाले होते. त्यांचे हसून स्वागत करायला आमिर विसरला नाही.हा पाहा आमिरच्या वाढदिवसाचा केक़ स्ट्रॉबेरी फळाच्या साहयाने बनवण्यात आलेला यम्मी केक कु णाला खावासा वाटणार नाही.केक कापत असताना आमिर खान. केक कापतानाही त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कमी झाले नाही.आपल्या अतरंगी हावभावांनी प्रेक्षकांचे मन जिंकणारा आमिर खान यावेळीही सर्वांकडे पाहून असे मजेशीर हावभाव करत होता.आमिर खानने अशी दिलखेचक पोझ देताच फोटोग्राफर्सची एकच गर्दी झाली. त्याची ही अनोखी अदा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यांनी अशी धडपड चालवली...