Join us  

Mouni Roy : "आता फरक पडत नाही, मी माझ्या कामाने..."; रिजेक्शनचा सामना करून मौनी झाली स्ट्राँग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:52 PM

1 / 10
टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने आता बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मौनीने एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून तिच्या प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू तिने चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली.
2 / 10
आज ती करण जोहरसोबत काम करत आहे, पण हा प्रवास मौनीसाठी अजिबात सोपा नव्हता. अभिनेत्रीने तिच्या 'शोटाइम' शोच्या प्रमोशनदरम्यान, संघर्षाच्या दिवसांबद्दल मीडियाशी मोकळेपणाने संवाद साधला आहे.
3 / 10
करण जोहरसोबत काम करणं हे कोणत्याही बॉलिवूड स्टारसाठी स्वप्नासारखं असतं. सध्या मौनी रॉय 'धर्मा प्रोडक्शन'च्या शो 'शोटाइम'मध्ये काम करत आहे. मौनी तिच्या यशाने खूप खूश आहे, पण तिला तिचे संघर्षाचे दिवसही आठवतात.
4 / 10
मीडियासमोर आपलं दु:ख शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा मी कोणत्याही चित्रपटाच्या ऑडिशनला जायचे तेव्हा लोक मला नाकारायचे. मी टेलिव्हिजनवरून आले असल्याने मला अभिनय करता येणार नाही असं त्यांना वाटत होतं.'
5 / 10
'सुरुवातीच्या काळात मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे काम मागायला जायचे तेव्हा तो म्हणायचा, तुझ्यात स्टारवाली गोष्ट नाही. तू मोठ्या पडद्यासाठी बनलेली नाही, पण खरं सांगायचं तर माझ्या मनात कोणाबद्दलही कटुता नाही.'
6 / 10
'आता यामुळे फरक पडत नाही, मी माझ्या कामाने उत्तर देईन. मला फक्त आता माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं आहे ' असंही मौनी रॉयने म्हटलं आहे. ती 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना खूप आवडला.
7 / 10
सध्या अभिनेत्री 'शोटाइम' शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सीरीजमध्ये ती अभिनेता इम्रान खानच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
8 / 10
9 / 10
10 / 10
टॅग्स :मौनी राॅय