By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:42 IST
1 / 10बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. पण, या अभिनेत्याने केवळ अभिनयानेच नाही तर त्याच्या कृतीनेही अनेकदा चाहत्यांची मनं जिंकली.2 / 10एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अवस्थेत सापडलेल्या नवजात मुलीला दत्तक घेऊन मिथुन यांनी तिला केवळ नावच दिले नाही, तर एका राजकुमारीसारखे आयुष्य दिले.3 / 10ही घटना ९० च्या दशकातील आहे. कोलकातामध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका नवजात बाळाचा रडण्याचा आवाज काही लोकांना आला. यावेळी एका दयाळू माणसाने त्या बाळाला वाचवलं आणि घरी नेले.4 / 10ही बातमी मिथून यांनी वर्तमानपत्रात वाचली, तेव्हा त्यांनी त्या बाळाला दत्तक घेण्याचं ठरवलं आणि कोलकाता गाठलं. त्यांची पत्नीसुद्धा या निर्णयामध्ये त्यांच्या सोबत होती. दोघांनी मिळून तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला.5 / 10मिथुन आणि पत्नी योगिता बाली यांनी या मुलीला अत्यंत प्रेमाने सांभाळले असून, तिचे नाव दिशानी चक्रवर्ती असे ठेवले.6 / 10भारतात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिशा पुढील शिक्षणासाठी लॉस एंजेलिसला गेली. पुढे ती न्यू यॉर्क अकादमीमधून पदवीधर झाली. 7 / 10दिशानीनं मिथून यांच्या पावलावर पाऊल ठेवतं २०१७ मध्ये, 'गिफ्ट' या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 8 / 10दिशानी त्यानंतर 'अंडरपास', 'होली स्मोक', 'टू फेस्ड' आणि 'व्हाय डिड यू डू इट' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची 'द गेस्ट' या लघुपटात दिसली होती.9 / 10दिशानी मोठी झाली असून ती प्रचंड सुंदर दिसते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर ९६,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.10 / 10दिशानी सध्या माइल्स मँटझारिस याला डेट करत आहे. दिशानी वारंवार तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करते.