By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:27 IST
1 / 8मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडचे स्टार आहेत. त्यांचं सिनेसृष्टीत फार मोठ योगदान आहे. पण, या अभिनेत्याने केवळ अभिनयानेच नाही तर त्याच्या कृतीनेही अनेकदा चाहत्यांची मनं जिंकली. 2 / 8मिथुन चक्रवर्ती यांचं पहिलं लग्न हेलेना ल्यूक यांच्याशी झालं होतं. मात्र ४ महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी विवाह केला. 3 / 8मिथुन चक्रवर्ती आणि योगिता यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मिथुन चक्रवर्ती यांची लेक दिशानीदेखील अभिनयात कार्यरत असून ती हॉलिवूड गाजवत आहे. 4 / 8दिशानीला मिथुन आणि योगिता यांनी दत्तक घेतलं होतं. जन्म घेताच दिशानीला तिच्या आईवडिलांनी कचराकुंडीत फेकून दिलं होतं. 5 / 8काही लोकांना दिशानी सापडली आणि त्याची वृत्तपत्रात बातमी आली. ही बातमी वाचताच मिथुन चक्रवर्ती कोलकाताला गेले आणि त्यांनी दिशानीला दत्तक घेतलं. 6 / 8दिशानीने अमेरिकेतून तिचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. तर न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून अभिनयाचे धडे तिने गिरवले आहेत. 7 / 8२०१७ मध्ये तिने दिशानीने गिफ्ट या शॉर्ट फिल्ममधून हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. द गेस्टमध्येही ती दिसली होती. 8 / 8सध्या दिशानी एका परदेशी मुलाला डेट करत आहे. बॉयफ्रेंडसोबतचे फोटो ती शेअर करताना दिसते.